अश्लील हावभाव हातवारे करून गाड्या थांबवायच्या, लॉजिंग समोरचं…

| Updated on: Sep 04, 2023 | 10:47 AM

पुणे सातारा महामार्गावर उभं राहून चुकीचं काम करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कडक करावाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अश्लील हावभाव हातवारे करून गाड्या थांबवायच्या, लॉजिंग समोरचं...
khed shivapur
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनय जगताप, खेडशिवापूर : पुणे सातारा महामार्ग (Pune satara highway) रोज काहीना काही कारणामुळं चर्चेत असतो. मागच्या काही दिवसांपासून खेडशिवापूरच्या (khedshivapur) काही भागात महिला चुकीचं काम करीत असल्याचं रस्त्याने जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या लोकांनी पोलिसांच्या निर्दशनास आणून आले. त्यानंतर खेडशिवापूर पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली होती. काही महिला तिथं असणाऱ्या लॉजच्यासमोर उभं राहून चुकीचं काम करीत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या महिलांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा अशी शंका पोलिसांना (rajgad police) आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

पुणे सातारा महामार्गावरील वेळू गावाच्या हद्दीत, सेवा रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर खेड शिवापूरच्या राजगड पोलिसांची कारवाई केली आहे. महामार्गावरील सेवा रस्त्यांशेजारी असणाऱ्या लॉजिंग समोरच्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहून त्या महिला अश्लील हावभाव हातवारे करीत होत्या. त्याचबरोबर जाणाऱ्या लोकांना वेश्या गमनास प्रवृत्त करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर कारवाई त्या महिलांवरती कारवाई करण्यात आली आहे. खेडशिवापूरच्या राजगड पोलिस स्टेशनमध्ये तिघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

लॉजची चौकशी सुरु

पोलिसांनी हायवे शेजारी असणाऱ्या सगळ्या लॉजची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी छापेमारी सुध्दा करणार आहेत. त्या महिलांसोबत आणखी काही महिला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चौकशीत अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सातारा मुंबई हायवेवरती कायम गाड्यांची गर्दी असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी रस्त्यात थांबा घेण्याची संख्या अधिक असल्यामुळे त्या महिला तिथं उभ्या राहत होत्या. लॉजच्या बाहेर सुध्दा गाड्यांची अधिक गर्दी असायची.