भाजप नेत्याच्या ब्लँकेट वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू

या दुर्घटनेनंतर टीएमसीने शुभेंदू अधिकारी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. या अपघातासाठी त्यांनी विरोधी पक्षनेत्याला जबाबदार धरले आहे.

भाजप नेत्याच्या ब्लँकेट वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू
भाजप नेत्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 8:51 PM

कोलकाता : भाजप नेत्याच्या ब्लँकेट वितरण कार्यक्रमात गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे घडली आहे. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना आसननोल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या कार्यक्रमात ही दुर्घटना घडली आहे. आसननोलचे माजी महापौर आणि भाजप नेते जितेंद्र तिवारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शुभेंदू अधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.

टीएमसीने या दुर्घटनेला विरोधी पक्षनेत्याला धरले जबाबदार

या दुर्घटनेनंतर टीएमसीने शुभेंदू अधिकारी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. या अपघातासाठी त्यांनी विरोधी पक्षनेत्याला जबाबदार धरले आहे. भाजपने पोलिसांच्या परवानगीशिवाय ही बेकायदेशीर रॅली काढल्याचे टीएमसीचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी आरोप केला आहे.

शुभेंदू अधिकारी यांनी माफी मागण्याची मागणी

आसननोल पोलीस सूत्रांनीही घोष यांच्या आरोपावर शिक्कामोर्तब केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी या दुर्घटनेप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी घोष यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

माजिद मेमन यांचा टीएमसीत पक्षप्रवेश

सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील आणि राष्ट्रवादीचे माजी नेते माजिद मेमन यांनी बुधावारी टीएमसी पक्षात प्रवेश केला. मेमन हे फेमस क्रिमिनल वकील आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार आहेत. 2014 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती.

दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मेघालयमध्ये निवडणुकीचे बिगुल फुंकले. ममतांनी महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले. तरुणाई आणि राज्याची संस्कृती जपण्याच्या नावाखाली मते मागितली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.