भिवंडीच्या पाहुण्यांचा इगतपुरीत बुडून मृत्यू, दोघांना वाचवताना तिसराही बुडाला !

भिवंडीमधील रमिज अब्दुल कादीर शेख आणि नदीम अब्दुल कादीर शेख हे दोघे तरुण इगतपुरी येथे आपल्या पाहुण्यांकडे रहायला आले होते.

भिवंडीच्या पाहुण्यांचा इगतपुरीत बुडून मृत्यू, दोघांना वाचवताना तिसराही बुडाला !
इगतपुरीत तीन तरुणांचा बुडून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 2:49 PM

इगतपुरी / शैलेश पुरोहित (प्रतिनिधी) : नगर परिषद तलावात पोहायला गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना इगतपुरी येथे घडली आहे. दोन तरुण भिवंडीहून इगतपुरीत पाहुणे आले होते. दोघेही स्थानिक तरुणासह नगर परिषद येथे फिरायला गेले होते. यावेळी दोन तरुण पोहायला तलावात उतरले. मात्र पोहताना दोघे बुडू लागले. त्यांना वाचवायला तिसरा तरुण गेला. मात्र तिघेही बुडाले. नगर परिषद कर्मचारी, जनसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक युवकांनी तीनही मृतदेह बाहेर काढले आहेत. तीनही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तरुणांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या केला आहे.

भिवंडीतील दोघे तरुण मामाकडे आले होते

शाहनवाज कादिर शेख, रमिज अब्दुल कादीर शेख आणि नदीम अब्दुल कादीर शेख अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. भिवंडीमधील रमिज अब्दुल कादीर शेख आणि नदीम अब्दुल कादीर शेख हे दोघे तरुण इगतपुरी येथे आपल्या पाहुण्यांकडे रहायला आले होते. यावेळी ते आपला मामा शाहनवाज कादिर शेखसह तलावाजवळ फिरायला गेले.

दोघांना वाचवायला गेला अन् तिसराही बुडाला

यावेळी पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र ते दोघे बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून तिसऱ्या तरुणाने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तिघेही बुडू लागले. रमिज अब्दुल कादीर शेख आणि नदीम अब्दुल कादीर शेख या दोघांचे मृतदेह तात्काळ बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा

उपचाराअभाी तिसऱ्याचा मृत्यू

यानंतर काही वेळाने त्यांना वाचवायला गेलेला मामा शाहनवाज कादिर शेख याला बाहेर काढले. मात्र पाण्यात बाहेर काढल्यानंतर शाहनवाज हा जिवंत असल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला वाचवण्यासाठी अत्यावश्यक सुविधा नसल्याने उपाचाराअभावी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.