नाशकात भरदिवसा मद्यधुंद प्राध्यापक कारचालकाचा थरार, चौघांना उडविले, दोघे गंभीर
भरदार वेगतील कारचा काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला तसेच पोलिसांनाही भरधाव वेगातील कारची माहिती कळविण्यात आली होती.
नाशिक : नाशिक शहरात गुरुवारी भरदिवसा मद्यधुंद अवस्थेतील प्राध्यापक कारचालकाने अक्षरशः धिंगाणा घातला आहे. शहरातील विविध भागात भरधाव वेगाने कार चालवत अनेकांना धडक देत थेट रुग्णालयातच पोहचवलं आहे. या घटनेची शहरात जोरदार चर्चा होत असून पेशाने प्राध्यापक असलेल्या कारचालकावर कठोर कारवाई करा अशी संतप्त मागणी होऊ लागली आहे. उपनगरपासून लेखानगर मार्गे चांडक सर्कलपर्यंत मद्यधुंद अवस्थेतील प्राध्यापक कारचालकाने चौघांना उडवले असून दोघेजण गंभीर तर आणखी दोघे किरकोळ जखमी आहे. त्यापैकी एकाने दुचाकीचा टायर फुटलेला असतांना पाठलाग करत मद्यधुंद कारचालकाला पकडले होते. सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटणेने शहरात खळबळ उडाली होती. अंबड पोलीस ठाण्यात याबाबत मद्यधुंद कारचालक साहेबराव दौलत निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद कार चालकाचे नाव साहेबराव दौलत निकम तो बिटको महाविद्यालयात प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली आहे.
निकम हा मदयधुंद अवस्थेमध्ये त्याच्या कारने नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाजवळून थेट चांडक सर्कल पर्यन्त भरधाव वेगाने आला यामध्ये त्याने चौघांना उडवले आहे.
भरदार वेगतील कारचा काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला तसेच पोलिसांनाही भरधाव वेगातील कारची माहिती कळविण्यात आली होती.
पोलिसांनी तात्काळ नियंत्रण कक्षावरून अलर्ट संदेश दिल्याने पोलीसही या कारचालकाच्या मागावर निघाले मात्र तो पर्यन्त त्याने चार जणांना उडवून जखमी केले होते.
या थरारात अविनाश प्रल्हाद साळुंके, पंकज शंकर मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे,
बिटको महाविद्यालय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – डीजीपी नगर – अशोका मार्ग – लेखा नगर – मुंबईनाका – चांडक सर्कल – जलतरण तलावासमोरील सिग्नल – मायको सर्कल – चांडक सर्कल – शासकीय विश्राम गृह – पुन्हा चांडक सर्कल असा थरार रंगला होता.
यामध्ये पंकज मोरे यांच्या पायावरुन कार गेली आहे. असल्याने दोन्ही पायला गंभीर दुखापत झाली आहे, तर साळुंके हे देखील प्राध्यापक असून ते देखील गंभीर जखमी आहे.
पंकज याच्या बहिणीचा काही दिवसांनी विवाह असल्याने पंकजचा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून मद्यधुंद कारचालकावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान कारचालकाची नशा उतरल्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अंबड पोलीसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.