भुरट्या चोरांमुळे नाशिकचे शेतकरी त्रस्त, बाजारभाव तेजीत असलेल्या पिकाची चोरी

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित परिस्थितीही वाचवून पीक वाचवली आहे.

भुरट्या चोरांमुळे नाशिकचे शेतकरी त्रस्त, बाजारभाव तेजीत असलेल्या पिकाची चोरी
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 2:10 PM

Nashik Crime : नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर (Nashik Farmer) आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. मुसळधार (Heavy Rain) पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालचे नुकसान झाले होते. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरडे डल्ला मारत आहे. त्या विशेष म्हणजे टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून भुरटे चोर रात्रीच्या वेळी टोमॅटो चोरी करत आहे. नाशिकच्या परिसरात टोमॅटो काढणी सुरू आहे. त्यात शेतात काढणीला आलेल्या टोमॅटोची चोरी होत असल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेकदा याबाबत तक्रार देऊनही चोर हाती लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित परिस्थितीही वाचवून पीक वाचवली आहे.

त्यातमध्ये टोमॅटो या शेतपिकाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपयांना प्रतिजाळी म्हणजेच कॅरेटला विकली जातेय.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या मखमालाबाद परिसरासह दिंडोरी, सिन्नर आणि पिंपळगाव परिसरात मोठ्या टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरात चोरांनी लक्ष केले आहे.

टोमॅटो पीक सध्या काढणीला आले आहे. त्यात दिवसभर शेतकरी आणि शेतमंजूर हे टोमॅटो काढतात, आणि शेतातच टोमॅटोचे कॅरेट भरून ठेवतात, आणि पहाटे मालवाहतूक वाहनाने बाजार नेतात.

अशी पद्धत ही सर्वत्र असते, यंदाच्या वर्षी शेतीमालाचे नुकसान झाल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे, आणि हीच संधी शोधून भुरटे चोर टोमॅटोची चोरी करत आहे.

या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसंत असून या चोरीबाबत ज्ञानेश्वर पिंगळे, शंकर पिंगळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मखमलाबाद शिवारात टोमॅटो चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आहे, याबाबत पोलिसांनी तातडीने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.