कहानी पूरी फिल्मी है… ट्राफिक जामने वाचवला चिमुकलीचा जीव, किडनॅपर्सच्या तावडीतून ती कशी सुटली ?

बिहारमधून अशी एक घटना समोर आली आहे जी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये. एका चिमुकल्या विद्यार्थिनीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं आणि तिला बेशुद्ध करून कारच्या डिक्कीत कोंबण्यात आलं. मात्र अचानक..

कहानी पूरी फिल्मी है... ट्राफिक जामने वाचवला चिमुकलीचा जीव, किडनॅपर्सच्या तावडीतून ती कशी सुटली ?
ट्राफिक जामने वाचवला मुलीचा जीवImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 10:21 AM

बिहारधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलं. अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीला किडनॅपर्सनी उटलून, बेशुद्ध करून गाडीच्या डिक्कीत टाकलं होतं आणि गाडी सुरू करून त्यांनी पळ काढला. पण पुढे गेल्यावर असं काही झालं की ते चांगलेच अडकले आणि त्या मुलीनेही त्यांच्या तावडीतून जीव वाचवत पळ काढला. आई-बाबांना फोन करून तिने सगळी घटना सांगितली. तिने नेमकी कशी केली आपली सुटका ?

झालं तरी काय ?

रिपोर्ट्सनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये ही घटना घडली आहे. तेथे बिहटा भागात शाळेत निघालेल्या चौथीतल्या मुलीचं अपहरण करण्यात आली. किडनॅपर्सनी तिला उचललं, बेशुद्ध करून गाडीच्या डिक्कीत टाकलं आणि ते निघाले. मात्र पुढे जाऊन त्यांची गाडी ट्राफिक जाममध्ये अडकून पडली. त्याचदरम्यान डिक्कीतली ती चिमुकली शुद्धीवर आली. डोकं चालवून तिने कशीबशी डिक्की उघडली आणि तिथून पळ काढत ती एका मॉलमध्ये जाऊन पोचली. तिथे जाऊन तिने कसाबसा आई-वडिलांना फोन लावत संपूर्ण प्रकार कथन केला.

या घटनेनंतर त्या विद्यार्थिनीच्या आईने बिहटा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांना दोन मुली असून त्या चालत शाळेत जातात. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मोठी मुलगी आधीच शाळेत गेली होती तर छोटी लेक थोड्या उशिराने शाळेत निघाली. ती शाळेत पोहोचायच्या आधीच कारमधून काही माणसं आली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने तिला थांबवलं तेवढ्यात दुसऱ्या आरोपीने तिच्या तोंडावर रुमाल ठेवत तिला कारच्या डिक्कीत कोंबलं.

पण पुढे जाऊन ती कार ट्राफिक जाममध्ये अडकली. माझ्या मुलीने डोकं चालवलं आणि कारची डिक्की उघडत ती बाहेर पडली आणि पळत जाऊन बाजारातील मॉल गाठून तिने कसाबसा फोन केला, तेव्हा आम्हाला हा सगळा प्रकार समजला. आम्ही मॉलमध्ये पोहोचलो आणि मुलीला सुखरूप परत आणले.

पोलिसांकडून तपास सुरू

बिहटा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार पांडे यांनी सांगितले की, मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कारची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.