accident : डॉक्टरकडे जात असताना काळाचा घाला; सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Jun 11, 2022 | 3:45 PM

दरम्यान मुख्तारच्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या मिक्सर वाहनाची घडक झाली. त्यात मुख्तार त्याच्या बहिणीसह खाली कोसळले. याचवेळी त्या मिक्सर वाहनाचे चाक दोघांच्या ही डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

accident : डॉक्टरकडे जात असताना काळाचा घाला; सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू
अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडक
Image Credit source: tv9
Follow us on

वैभववाडी : वैभववाडी राज्यमार्गावर (Vaibhavwadi State Highway) अपघातांची मालिका सुरुच ही सुरूच असल्याचे समोर येत आहे. या राज्यमार्गावर आधी मधी अपघात हे घोतच असतात. आज शनिवारी याच मार्गावर आणखी एक अपघात (Accident) घडल्याचे समोर आले आहे. ज्यात काँक्रीट मिक्सर वाहनाचे चाक सख्ख्या बहीण भावाच्या (sister and brother) डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. तर अपघातात मृत झालेल्यांची नावे ही मुख्तार महंमद थोडगे (वय18) व मोमीना नावळेकर (वय 22) अशी आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टरकडे जात असताना काळाचा घाला

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोळपे गावात मुख्तार महंमद थोडगे याचे परिवार राहते. मुख्तार हा 12वीत शिकत होता. तर त्याची बहीण मोमीना नावळेकर ही विवाहीत असून तिला दोन महिन्यांची मुलगी आहे. ती काही कामानिमित्त घरी आली होती. तर तिची आज तब्बेत बिघडली होती. त्याकारणाने मुख्तार हा दुचाकीने बहीणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टरकडे जात होता.

दरम्यान मुख्तारच्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या मिक्सर वाहनाची घडक झाली. त्यात मुख्तार त्याच्या बहिणीसह खाली कोसळले. याचवेळी त्या मिक्सर वाहनाचे चाक दोघांच्या ही डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक पसार झाला आहे. त्यामुळे अपघाताने कोळपे गावावर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला होता

याच्याआधी ही कोल्हापूर गोवा मार्गावरिल वैभववाडी करुळ घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला होता. कोल्हापूरहून गोव्याकडे जाणार ट्रक वैभववाडी करुळ घाटात दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नव्हती. त्यावेळी जखमी ट्रकचालकाला वैभववाडी पोलिसांनी सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने दरीतून बाहेर काढले होते.