ट्रक चालकाचा ताबा सुटला, ट्रक थेट मेंढ्याच्या कळपात, 12 मेंढ्या चिरडल्या, लाखोंचं नुकसान
आयशर ट्रक वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेने चाललेल्या मेंढ्याच्या कळपात हा ट्रक घुसला. यामध्ये 12 मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. (Truck driver lost control of vehicle, truck directly into sheep herd, 12 sheep crushed in Sangli)
सांगली : सांगलीच्या आटपाडीमध्ये सिमेंट भरून दिघंचीकडे भरधाव वेगाने निघालेला आयशर ट्रक, वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेने चाललेल्या मेंढ्याच्या कळपात घुसला. यामध्ये 12 मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात मेंढपाळांचं जवळपास चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. (Truck driver lost control of vehicle, truck directly into sheep herd, 12 sheep crushed in Sangli)
आयशर थेट मेंढ्याच्या कळपात, 12 मेंढ्या चिरडल्या
कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या मेंढ्याच्या कळप रस्त्याने चालत होता. याच कळपात वेगाने आयशर ट्रक घुसला. या अपघातात 12 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये जवळपास चार लाखांचे नुकसान झाले असून या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील केरली या गावातील दहा मेंढपाळाचा एक हजाराचा मेंढ्यांचा कळप गेल्या तीन दिवसापासून आटपाडीत बालटे वस्तीवर मुक्कामाला होता. हे मेंढपाळ आटपाडीतून दिघंचीकडे मुख्य रस्त्यावरून निघाले होते.
डोळ्यादेखत मेंढ्या चिरडल्या, मेंढपाळ सैरभैर
दुपारी आटपाडीतून दिघंचीकडे सिमेंट भरुन आयशर ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट मेंढ्याच्या कळपात घुसला. कळपातील सोळा मेंढ्याच्या अंगावरून ट्रक गेल्याने बारा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात मेंढ्यांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर मेंढपाळ अगदी सैरभैर झाले होते.
वाहन चालकाला पोलिसांकडून अटक, भरपाईचं काय?
संबंधित ट्रक चालकाचे मालक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीशी स्थानिकांनी संपर्क साधून मेंढपाळांना मदत मिळवून देण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले. ट्रक मालकाने दुपारी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते मात्र सायंकाळी त्यांने हात वर केले. आटपाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
(Truck driver lost control of vehicle, truck directly into sheep herd, 12 sheep crushed in Sangli)
हे ही वाचा :
सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या बेड्या