ट्रक साईडला उभा करुन जेवायला चालला होता चालक, रस्त्यात अडवून तडीपार गुंडाने बेदम चोपले मग…

कल्याणमध्ये तडीपार गुंडाने उच्छाद मांडला आहे. पाच महिन्यांपूर्वी दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या गुंडाकडून लुटमारीच्या घटना उघडकीस येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ट्रक साईडला उभा करुन जेवायला चालला होता चालक, रस्त्यात अडवून तडीपार गुंडाने बेदम चोपले मग...
तडीपार गुंडाने ट्रक चालकाला लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:25 AM

कल्याण / सुनील जाधव : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारांना तडीपार केलं जातं. पण कल्याणमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी पाच महिन्यांआधी एका अट्टल गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार केलं होतं. मात्र हाच आरोपी पुन्हा एकदा नवीन गुन्हा करताना याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडला आहे. एका ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुंडाला अटक केली आहे. उमेर नविद शेख असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.

ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न

कल्याण गोविंदवाडी रोडवर कोल्हापूरच्या दिशेकडून एक ट्रक येत होता. कल्याण बाजारपेठ परिसरात जेवण्यासाठी ट्रक उभा करुन चालक जात होता. यावेळी दोघांनी ट्रक ड्रायव्हरला अडवलं. त्याला धक्काबुक्की करत त्याचा मोबाईल आणि पैसे हिसकावले. ट्रक चालकाने आरडाओरडा केला असता, परिसरातील काही लोकांनी या दोघांपैकी एका आरोपीला पकडले.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे एकाला पकडले

आरोपीला गोविंदवाडी रोडवर पेट्रोलिंग करत असलेले पोलीस हवालदार सचिन साळवी आणि पोलीस हवालदार प्रेम बागुल यांच्या ताब्यात दिले. तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. जहीर शेख असे फरार आरोपीचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी कल्याणातील चौधरी मोहल्ला, दुधनाका येथे राहतात. यामधील अटक असलेला आरोपी उमेर नविद शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कल्याण डोंबिवली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठ पोलिसांनी त्याच्यावर पाच महिन्यांपूर्वी तडीपारची कारवाई करत, ठाणे जिल्ह्यातून त्याला तडीपारही केले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.