अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन, विकृत शिक्षकाची नागरिकांकडून अर्धनग्न धिंड
बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण उघडकील आल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया येत असून त्याचे अनेक पडसादही उमटत आहेत. त्यानंतर राज्यातील अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. मात्र त्यामुळे मली, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा असेच एक वाईट कृत्य घडल्याचे समोर आले आहे.
बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण उघडकील आल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया येत असून त्याचे अनेक पडसादही उमटत आहेत. त्यानंतर राज्यातील अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. मात्र त्यामुळे मली, महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा असेच एक वाईट कृत्य घडल्याचे समोर आले आहे. खासगी शिकवणी घेणाऱ्या एका इसमाने शिक्षकी पेशाला काळिमा फसला आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विरारमधील ही खळबळजनक घटना असून संतप्त नागरिकांन त्याची अर्धनग्न धिंड काढून त्याला अखेर पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुलीने क्लासला जायला दिला नकार, आईने विचारल्यावर अखेर…
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप मोहनलाल मोर्या असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो विरार पूर्व कारगिल नगर मधील रहिवाशी आहे. आरोपी शिक्षकाचे विरार शहरात खासगी क्लासेस आहेत. पीडित मुलगी अवघी 13 वर्षांची असून ती त्या शिक्षकाच्या क्लासमध्ये शिकण्यास जात होती. 21 ऑगस्ट पासून हा शिक्षक त्या मुलीशी अश्लील वर्तन करीत होता. शेवटी त्या मुलीने क्लास ला जाण्यास नकार दिला. तेव्हा तिच्या आईने विश्वासात घेऊन तिला खोदून खोदून विचारलं. अखेर तिने आईला सगळा प्रकार सांगितल्यावर हा गुन्हा उघडकीस आला.
ही घटना समजताच त्या मुलीचे पालक हादरलेच. तिच्या कुटु्ंबियांनी तसेच क्लासमधील इतर मुलांच्या पालकांनी आणि स्थानिक महिला नगारिकांनी तसेच पुरुषांनी तो क्लास गाठला. तेथे जाऊन त्या शिक्षकाला जाब विचारत त्याला बेदम मारहाण केली. त्याची धिंड काढत त्याला अखेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.