भूमाफिया, सावकारी, हद्दपारी… मंकावती तीर्थकुंड हडप करणाऱ्या देवानंद रोचकरींचा गुन्ह्यांचा मोठा इतिहास

देवानंद रोचकरी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यात सावकारी, शासकीय जमीन हडप करणे, त्यावर कोर्टाचे आदेश झुगारून अतिक्रमण करणे, सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अशा गुन्हांचा त्यात समावेश आहे. यातील अनेक प्रकरणे निर्दोष निकाली लागली आहेत. मात्र, गुन्ह्याची यादी व दहशतीचा इतिहास मोठा आहे.

भूमाफिया, सावकारी, हद्दपारी... मंकावती तीर्थकुंड हडप करणाऱ्या देवानंद रोचकरींचा गुन्ह्यांचा मोठा इतिहास
मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात देवानंद रोचकरी यांना अटक
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 12:27 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील पुरातन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी गेल्या 8 दिवसापासून फरार असलेले आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. रोचकरी याना मुंबईत मंत्रालय परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे देवानंद रोचकरी यांना मंत्रालय प्रेम घातक ठरल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण नाट्यमय प्रकरणात मंत्रालय हे केंद्रबिंदू ठरले आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातुन होतो तिथे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी खुलेआम वावरतो! यावरून मंत्रालय सुरक्षा व इतर यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोचकरी हे मंत्रालयात कोणत्या मंत्र्यांना भेटले? त्यावेळी उस्मानाबादचे कोणते लोकप्रतिनिधी उपस्थित होते? याबाबत आता चर्चेला उधाण आलं आहे. ( Accused Devanand Rochkari’s criminal history)

फरार रोचकरी हे मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक रातोरात मुंबईत दाखल झालं. त्यानंतर रोचकरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी रोचकरी यांच्या अटकेची माहिती दिली आहे. रोचकरी यांना अटक केल्यावर त्याची नोंद मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आता त्यांना उस्मानाबाद पोलीस तुळजापूर येथे घेऊन येत आहेत. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहूल रोटे, पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंकावती प्रकरणी 4 मुद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याला रोचकरी यांनी मंत्रालयातुन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थगिती आणली. पुढे सुनावणी अंती मंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठवली होती. त्यामुळे रोचकरी बंधूवर गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा नोंद झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळेल या आशेपोटी मंत्रालय गाठले होते. मात्र, तिथेच त्यांना उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली.

देवानंद रोचकरींना अटक, बाळासाहेब रोचकरी फरार

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यासह अन्य आरोपीवर गुन्हा नोंद होता. मात्र, त्यातील देवानंद याना अटक केली असून बाळासाहेब रोचकरी अद्यापही फरार आहेत. बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोणते अधिकारी सहभागी होते, हे पोलीस तपासात बाहेर येणार आहे. रोचकरी यांना अटक केल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. रोचकरी यांच्या गुन्ह्यांची भूमिका न्यायालयात मांडून तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. (Accused Devanand Rochkari’s criminal history)

देवानंद रोचकरींवरील गुन्ह्यांची मालिका

देवानंद रोचकरी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यात सावकारी, शासकीय जमीन हडप करणे, त्यावर कोर्टाचे आदेश झुगारून अतिक्रमण करणे, सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अशा गुन्हांचा त्यात समावेश आहे. यातील अनेक प्रकरणे निर्दोष निकाली लागली आहेत. मात्र, गुन्ह्याची यादी व दहशतीचा इतिहास मोठा आहे. रोचकरी यांच्यावर यापूर्वी 2 वेळा हद्दपारची कारवाईही करण्यात आली होती. उस्मानाबाद पोलीस दलाने अखेर तुळजापूर येथील मोठ्या भूमाफियाला अटक केल्यानं उस्मानाबाद पोलिसांचे कौतुक होत आहे. तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप केल्याचे प्रकरण टीव्ही 9 ने उजेडात आणले होते. तसंच सातत्याने पाठपुरावा केला होता. देवानंद रोचकरी यांच्यासह इतरांवर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468, 469, 471 व 34 सह गुन्हा नोंद आहे.

रोचकरी यांना अटक करण्यासाठी उस्मानाबाद पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने रोचकरी यांच्या घरी जाऊन तपास केला. मात्र, ते घरात आढळून आले नव्हते. दरम्यान मंकावती प्रकरणा नंतर अनेक तक्रारी समोर येत आहेत. रोचकरी यांच्यावर आजवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. पोलीस त्याची जंत्री जमा करीत आहेत. देवानंद रोचकरी यांच्यावर दाखल गुन्ह्याचा इतिहास मोठा असून, हद्दपार कार्यवाहीसह एका गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुद्धा झाली असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांना कार्यलयात जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला होता, त्या प्रकरणात रोचकरी हे जामीनावर आहेत.

सरकारी जागा बळकावल्या!

तुळजापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील, तसेच जुने बसस्थानकसमोर रोचकरी यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कायदा विभागाचे तालुका कार्याध्यक्ष जनक कदम-पाटील, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या दोन्ही सरकारी जागा बळकावण्याच्या हेतूने रोचकरी यांनी भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बोगस कागदपत्रे बनविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.

तुळजापूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी अनेक पुरातन ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या भूमाफियांनी बनावट कागदपत्रे करून हडप केल्या आहेत. त्या जागा महसूल आणि नगर परिषद प्रशासन ताब्यात घेऊन भूमाफियांच्या मुसक्या आवळणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे 4 मुद्द्यांवर कारवाईचे आदेश

दरम्यान, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी आणि तुळजापूर तहसीलदार, तसेच मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी, असे चार मुद्दे आदेशित केले होते, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य आणि देविविजय पुराणात आहे.

इतर बातम्या :

“बाप म्हणतात तुळजापूरचा” मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणात आदेशाला स्थगिती, देवानंद रोचकरी समर्थकांचा जल्लोष

मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरण, फरार आरोपी देवानंद रोचकरी अखेर मंत्रालयाजवळ सापडला

Accused Devanand Rochkari’s criminal history

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.