Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शरद मोहोळ याच्यावर नेमका कसा हल्ला झाला?, पाहा व्हिडीओ

| Updated on: Jan 06, 2024 | 9:39 PM

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा हत्या झाली होती. मोहोळचा गेम एकदम पर्फेक्ट प्लॅनिंग करून केला गेला. मुन्ना पोळेकर याने मोहोळ याला बाहेर काढलं त्यानंतर मिळून हल्ला केला. टीव्ही 9 मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये कसं प्लॅनिंग होतं? नेमका हल्ला कसा झाला पाहा.

Follow us on

मुंबई :  पुण्यात भरदिवसा गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. तीन सेकंदात 4 गोळ्या झाडून मोहोळला संपवण्यात आलं. शरद मोहोळच्याच घरी जेवण करुन, नंतर हल्लेखोरांनी काटा काढला. ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतात. पुण्यातला गुंड शरद मोहोळची हत्या कशी झाली, हे या सीसीटीव्हीत कैद झालंय.

सुरुवातीला एक व्हाईट टोपीवाला हल्लेखोर, चालत येताना दिसतोय. त्याचा हात खिशात आहे, कारण त्याच्या खिशात पिस्तुल आहे. तो इमारतीच्या साईडला उभा राहतो. म्हणजेच तो मोहोळच्या येण्याची वाट बघतोय. त्याच्याच मागे मोबाईलवर बोलत बोलत दुसरा आरोपी येतोय. तोही तिथंच थांबतोय. तितक्यात पिस्ता कलरच्या सदऱ्यात शरद मोहोळ येताना दिसतोय. त्याच्याच मागे निळ्या जॅकेटमध्ये मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर चालतोय. त्याचवेळी अचानक जॅकेटमधून पिस्तुल काढून तो शरद मोहोळवर पाठीत पहिली गोळी मारतो.

तिसरी गोळी इमारतीखाली दबा धरुन बसलेला पांढऱ्या टोपीतल्या हल्लेखोरांनं झाडली. तिसऱ्या गोळीनंतर शरद मोहोळ जमिनीवर कोसळला. त्यानंतर पुन्हा चौथी गोळी साहिल पोळेकरनं थेट छातीवर मारली आणि तिथंच मोहोळचा जागेवरच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी 3 सेकंदात शरद मोहोळवर 4 गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर शरद मोहोळ सोबत असणाऱ्या 2 साथीदारांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. शरद मोहोळच्या समोर चालणारा व्यक्ती आणि लाल टीशर्ट घातलेल्या व्यक्तीनं व्हाईट टोपी घातलेल्या हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हल्लेखोर निसटून गेला.

हल्लेखोर पळून गेल्यानंतर, मोहोळच्या दोन्ही साथीदारांनी शरद मोहोळकडे धाव घेतली. पण मोहोळ जमिनीवर पडून होता.त्या दोघांनी मोहोळला उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक जण बाजूलाच असलेली स्कूटर आणण्यासाठी जातो. त्याच स्कूटरवर बसवून मोहोळला हॉस्पिटलमध्ये नेलं असावं. कारण एवढाच सीसीटीव्ही हाती लागलाय. विशेष म्हणजे पूर्ण प्लॅन करुन शरद मोहोळला संपवण्यात आलंय.

गोळ्या झाडणारा त्याचाच सहकारी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर मोहोळच्या घरी गेला आणि सोबत जेवणंही केलं. जेवण केल्यानंतर शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांसह पोळेकरही घराबाहेर पडला. शरद मोहोळच्याच मागे मुख्य हल्लेखोर साहिल पोळेकर चालत होता. संधी साधून जॅकेटमधून पिस्तुल काढत पोळेकरनं जवळून 3 गोळ्या झाडल्या आणि एक गोळी दुसऱ्या हल्लेखोरानं झाडली

आता शरद मोहोळची हत्या का झाली ?, तर त्याचं कारण आहे जुनं वैमनस्य

मुख्य हल्लेखोर साहिल पोळेकरचा मामा नामदेव कानगुडे आणि दुसरा नातेवाईक विठ्ठल गांधलेचं मोहोळबरोबर वैमनस्य होतं. त्यातूनच शरद मोहोळची हत्या झालीय. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावरुन रोहित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. फडणवीस ज्या शहरात जातात, तिथं दिवसाढवळ्या हत्या होतात. त्यामुळं फडणवीसांनी गृहमंत्रिपदाकडे लक्ष द्यावं असं रोहित पवार म्हणालेत. गुंड मोहोळच्या हत्येनंतरचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी उसळली.