Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Murder : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या, दोन आरोपींना अटक

नगर-पुणे हायवे लगत चास शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजार झाले. त्यानंतर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ahmednagar Murder : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या, दोन आरोपींना अटक
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:19 PM

अहमदनगर : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागा (Anger)तून एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना मंगळारी अहमदनगरमधील चास शिवारात घडली आहे. हत्या करण्यात आलेला तरुण आरोपींचा मावस भाऊ आहे. दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून आपल्या मावस भावाची हत्या केली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक (Arrest) केली आहे. नगर-पुणे हायवे लगत चास शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजार झाले. त्यानंतर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप अधिक तपास करत आहेत.

हत्येनंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाला

हनुमंत नरसू गायकवाड (23) आणि सूरज लक्ष्मण मोरे (22 दोघे राहणार बाभुर्डी घुमट, ता. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर राहुल कनका मोरे (19, रा. बाभुर्डी घुमट, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. आरोपी हनुमंत गायकवाड हा बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आणि त्याने आपण हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. चास हा परिसर नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. कोतवाली पोलिसांनी तत्काळ नगर तालुक्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याशी संपर्क केला. दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलिसांचे संयुक्त पथक आरोपीला घेऊन घटनास्थळी पोहोचले. पुणे रोडवरील चास शिवारातील फलके फार्म हाऊसच्या पाठीमागे मयत राहुल मोरे याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

सूरज मोरे याच्या पत्नीबद्दल अपशब्द काढल्याने ही हत्या

पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करत चौकशी केली असता त्याने सूरज मोरे याचाही हत्येत संबंध असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बाभुर्डी गावात जाऊन सूरज याला ताब्यात घेतले. सूरज याच्या पत्नीबद्दल राहुल मोरे याने अपशब्द वापरले होते. याचाच राग येऊन सूरज व हनुमंत या दोघांनी मंगळवारी रात्री राहुल याला मोटारसायकलवरून चास शिवारात नेले. तिथे पोहोचल्यानंतर या दोघांनी दोरीच्या सहाय्याने गळा आवळून राहुल मोरेची हत्या केली व मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. राहुल मोरे हा सूरज मोरे याचा मावस भाऊ होता. हनुमंत गायकवाड, सूरज आणि राहुल हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून, रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केले असल्याची कबुली आरोपींनी दिली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Two accused arrested for killing youth out of anger in ahmednagar)

हे सुद्धा वाचा

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....