Mira Road Murder : मीरा रोडमधील अल्पवयीन मुलाची हत्या प्रकरण, दोन आरोपींना अटक

मयंक सिंह श्रीमंत घरातील असल्याने त्याचे अपहरण करुन खंडणी वसुल करण्याचा आरोपींनी प्लान केला. त्यानुसार आरोपींनी मयत मयंक सिंह याला 31 जुलै रोजी आपल्या गाडीवर बसवून नायगावला नेले.

Mira Road Murder : मीरा रोडमधील अल्पवयीन मुलाची हत्या प्रकरण, दोन आरोपींना अटक
मीरा रोडमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणी आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 8:27 PM

मीरा रोड : मीरारोडमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय मयंक सिंह नावाच्या मुलाची अपहरण (Kidnapping) आणि निर्मम हत्या (Murder) प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. अफजल आणि इरफान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी बेरोजगार आहेत. यामुळे पैसे कमवण्यासाठी दोघांनी अपहरण आणि खंडणीचा मार्ग अवलंबला. यातूनच आरोपींनी श्रीमंत घरातील असलेल्या मयंकचे अपहरण करून हत्या केली आणि मग 35 लाखांची खंडणी मागितली होती. मयत मयंक सिंह दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. मयंकचे कुटुंबीयांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

कॉल ट्रेस करुन पोलिसांनी आरोपींना अटक केले

मयत मयंक हा 31 जुलै रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर मयंकच्या कुटुंबीयांना मुलाला सोडण्यासाठी 35 लाख रुपये खंडणी देण्यासाठी आरोपींचा फोन आला. मयंकच्या आईने तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कॉल ट्रेस करुन आरोपी अफजल आणि इरफान या दोघांचा शोध घेत त्यांना अटक केली. दोघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मयंकची हत्या केल्याचेही आरोपींनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 2 ऑगस्ट रोजी वसई नायगाव परिसरातून मयंकचा मृतदेह ताब्यात घेतला.

काय आहे प्रकरण ?

आरोपी अफजल आणि इमरान दोघेही बेरोजगार आहेत. दोघांनाही कामधंदा सुरु करण्यासाठी पैशाची गरज होती. अफजलला स्वतःचे सलून सुरु करायचे होते तर इमरानला गॅरेज सुरु करायचे होते. यासाठी दोघांनी श्रीमंत घरातील मुलाचं अपहरण करून खंडणी मागण्याचं षडयंत्र केलं. मयंक सिंह शांती पार्क येथील रॉयल पॅलेस इमारतीमध्ये आपल्या नातेवाईकांच्या घरी येत असल्यामुळे आरोपींची त्याच्याशी एक महिन्यापूर्वी ओळख झाली होती. मयंक सिंह श्रीमंत घरातील असल्याने त्याचे अपहरण करुन खंडणी वसुल करण्याचा प्लान केला. त्यानुसार आरोपींनी मयत मयंक सिंह याला 31 जुलै रोजी आपल्या गाडीवर बसवून नायगावला नेले. मयंक हे सगळं आपल्या कुटुंबीयांना किंवा पोलिसांना सांगेल या भीतीने आरोपींनी मयंकची हत्या केली. मयंक सिंहच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करत चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत. (Two accused arrested in the case of the murder of a minor boy in Mira Road)

हे सुद्धा वाचा

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.