‘या’ चोरट्यांची शक्कल पाहून तुम्हीही हैराण व्हाल, डिलिव्हरी बॉयला गंडा घालणारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात

दोघे जण आधी ऑनलाईन वस्तू ऑर्डर करायचे. मग डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला की त्याला हातोहात गंडवून, पैसे नसल्याचे कारण सांगत फसवायचे.

'या' चोरट्यांची शक्कल पाहून तुम्हीही हैराण व्हाल, डिलिव्हरी बॉयला गंडा घालणारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात
डिलिव्हरी बॉयला लुटणारे अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 12:53 PM

सांगली / शंकर देवकुळे : ऑनलाईन खरेदी करुन पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला गंडा घालणाऱ्या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. महमंद उर्फ जॉर्डन इराणी आणि उम्मत इराणी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सात लाख रुपये किमतीचे 14 मोबाईल जप्त केले आहेत. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींनी आणखी किती ठिकाणी असा गंडा घातला आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला गंडा घालायचे

दोघे आरोपी ऑनलाईन मोबाईल ऑर्डर करायचे. मग पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून किमती मोबाईल हातोहात लंपास करायचे. डिलिव्हरी बॉयला नेट बँकिंगद्वारे पैसे दिल्याचे भासवले जात होते, तर कधी बोलण्यात गुंतवून जोडीदार किंमती मोबाईल काढून त्याऐवजी साबणवडी टाकून पूर्ववत पॅकिंग करायचे. मग पैसे नसल्याचे सांगत पार्सल परत पाठवायचे. गेल्या आठ दिवसात सांगलीसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, पलूस, इस्लामपूर, विटा आदी ठिकाणी ऑनलाईन खरेदी वस्तू घरपोच करणाऱ्यांना फसवण्याचे प्रकार घडले होते.

स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपी अटक

याप्रकरणी सांगली गुन्हे शाखेकडे तक्रार आली होती. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला. कुपवाड रस्त्यावरील भारत सूतगिरणी येथे दोघे किमती मोबाईल घेऊन उभे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी महमंद उर्फ जॉर्डन इराणी आणि उम्मत इराणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी आयफोन, सॅमसंग कंपनीचे 40 ते 70 हजाराचे 14 मोबाईल फसवणूक करुन लंपास केल्याची कबुली दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....