कोल्हापुरातून गोव्याला जायचे, फिरण्यासाठी बाईक भाड्याने घ्यायचे अन् ओएसएक्सवर विकायचे !

हल्ली चोरटे चोरीसाठी काय मार्ग अवलंबतील सांगता येत नाही. नुकतीच गोवा पोलिसांनी कोल्हापुरात कारवाई करत दोन बाईक चोरट्यांना बेड्या ठोकल्या. चोरट्यांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही हैराण झाले.

कोल्हापुरातून गोव्याला जायचे, फिरण्यासाठी बाईक भाड्याने घ्यायचे अन् ओएसएक्सवर विकायचे !
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 2:10 PM

कोल्हापूर : हल्ली वाहन चोरींच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. चोरटे चोरीसाठी काय करतील याचा नेम नाही. कोल्हापुरमध्ये उघडकीस आलेली घटना पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. वाहनचोरीसाठी चोरट्यांची मो़डस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले. कोल्हापुरमधील दोघे चोरटे गोव्यातून बाईक चोरायचे आणि कोल्हापुरात आणून ओएसएक्सवर विकायचे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही कोल्हापुरातून बेड्या ठोकल्या आहेत. सद्दाम जामदार असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सद्दामला याआधीही अशा गुन्ह्यात अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामीननावर सुटला होता. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

फेक लायसन्सद्वारे बाईक भाड्याने घ्यायचा

सद्दाम जामदार हा गोव्याला फिरण्याच्या बहाण्याने जायचा. तेथे बनावट लायसन्सच्या आधारे फिरण्यासाठी भाड्याने बाईक घ्यायचा. मग ती बाईक घेऊन थेट कोल्हापुरात यायचा. तेथे बाईकचा नंबर बदलायचा आणि ओएलएक्सवर विकायचा. ग्राहकाने बाईक परत न दिल्याने बाईकच्या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. गोवा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.

सद्दामने याआधीही चार बाईक चोरुन विकल्या

तपासादरम्यान पोलिसांना कोल्हापुरातील सद्दाम जामदार हा सराईत गुन्हेगार अशा प्रकारे बाईक चोरुन नेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सद्दामसह त्याच्या साथीदाराला कोल्हापुरातून बेड्या ठोकल्या. सद्दाम याआधी अशा प्रकारे चार बाईक गोव्यातून कोल्हापुरात आणून फेक नंबर प्लेट लावून विकल्या होत्या. सद्दाम हा सराईत चोरटा आहे. याआधीही तो बाईक चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला होता.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.