धक्कादायक! दोघा बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी, मालेगाव शहरात राहण्यासाठी काय केलं होतं?
2020 मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दोघेही शहरात राहत होते. दोघांनी इतरांच्या मदतीने खोटा जन्मदाखला तयार केला होता.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये दोन बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहेत. या घटनेने मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. न्यायालयात दोन बांगलादेशी नागरिकांनी कबुली दिल्याने ही बाब उजेडात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षाचा कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये आमीन अन्सारी आणि ताहीर अली युसूफ अली या दोघांची नावे समोर आली आहे. यामध्ये आर्थिक दंड न भरल्यास आठ दिवस अधिकचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीक डी. डी. कुरूलकर यांच्यापुढे ही सुनावणी झाली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींनी मालेगावमध्ये राहण्यासाठी तेथील बनावट रहिवासी पुरावे बनविले होते. त्याकरिता त्यांनी मालेगाव महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्कयांचा वापर केला आहे. 2020 मध्ये हे दोघेही वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले असून इतर आरोपींच्या बाबत सुनावणी प्रलंबित आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी असल्याचे भासविण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा सहारा घेतला होता, मात्र, ती फसवणूक आता उजेडात आली आहे.
ताहीर अली युसूफ अली याने गोल्डननगर आणि आलम आमीन अन्सारी हजारखोली येथील पत्त्याचे बनावट कागदपत्रे बनविले होते.
2020 मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये दोघेही शहरात राहत होते. दोघांनी इतरांच्या मदतीने खोटा जन्मदाखला तयार केला होता.
त्यावर मालेगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचे आढळून आले आहे. याशिवाय त्यावरून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड ही बनावट कागदपत्रे बनावट असतांना खरी म्हणून भासवली होती.
धक्कादायक बाब म्हणजे मालेगाव शहरातील रहिवासी असल्याचे कागदपत्रे तयार करत ती खरी असल्याचे भासवून पासपोर्ट तयार केला आहे.
दोघा आरोपींनी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केलेच आहे पण बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश कसा केला याचीही कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.