Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

अनिल वरुटे यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नारायण मडके याला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू
दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 12:14 PM

कोल्हापूर / साईनात जाधव (प्रतिनिधी) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरातील सादळे-मादळे घाटात घडली आहे. अनिल बाबुराव वरुटे आणि नारायण तुकाराम मडके अशी अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. धडक इतकी जोरदार होती की यात मोटारसायकलींचा चक्काचूर झाला. अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

कासारवाडीतून जात असताना दोन्ही दुचाकींची धडक

करवीर तालुक्यातील सादळे-मादळे येथील सादळे कासारवाडी घाटात ही अपघाताची घटना घडली. कासारवाडीतून जात असताना कुरण माळाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा दुचाकीस्वाराला रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

अनिल वरुटे हा मजुरीचे काम करतो

अनिल बाबुराव वरुटे हा आपल्या कुटुंबासह सादळे येथील साळुंखे फार्म हाऊसमध्ये मजूर म्हणून काम करतो. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून कासारवाडीकडे येत होता.

नारायण मडके हा अपंग व्यक्ती मादळेकडे चालला होता

यावेळी नारायण तुकाराम मडके हा अपंग व्यक्ती आपल्या आपल्या दुचाकीवरून मादळेकडे जात असताना कासारवाडी आणि सादळे येथील कुरण माळाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोराची होती की मोटरसायकलचा चुरा झाला होता.

यात अनिल वरुटे यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नारायण मडके याला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.