CCTV Video | दोघे आले, एकानं बंदूक ताणली, हवेत गोळीबार करत बँक लुटून पसार! कुठं घडला थरार?
Hingoli CCTV : लुटरुंच्या धाकानं हिंगोलीतल्या सगळ्यात बँकेतील कर्मचारी कमालीचे धास्तावले आहेत. ही संपूर्ण घटना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वसमत तालुक्यातली शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
हिंगोली : हिंगोलीतून (Hingoli) एक धक्कादायक घटना समोर येते आहेत. मुंबईच्या दहीसरमध्ये काही दिवसांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवून एसबीआय बँकेत लुटीची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपांना अखेर मुंबई पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान, आता बंदुकीचा धाक दाखवत पुन्हा एकदा बँक लुटण्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात घडला आहे. वसमतमधल्या आंबा चौंडी इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत (Maharashtra Gramin Bank) चोरांनी बँक लुटली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच लुटरुंच्या धाकानं हिंगोलीतल्या सगळ्यात बँकेतील कर्मचारी कमालीचे धास्तावले आहेत. ही संपूर्ण घटना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वसमत तालुक्यातली शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. बँक लुटण्याच्या घटनेनंतर पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आलं असून पोलिसांनी बँकेत धाव घेतली. त्यानंतर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं चोरट्यांचा शोध घेऊन तपास करण्यासाठी पोलिसांनी पथकं तैनात केली. यानंतर तिघांना ताब्यातही घेण्यात आलंय. दरम्यान, यावेळी बँक लुटारुंनी फक्त बंदूक कर्मचाऱ्यांवर ताणलीच नाही, तर हवेत गोळीबारदेखील केल्याचं सांगितलं जातंय.
बँकेत काय घडलं?
दोन लुटारु अचानक महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले. एकाच्या हातात बंदूक होती. तर दुसऱ्याच्या हातात पाठीवर मारायची बॅग होती. यातील एकानं कर्मचाऱ्याच्या अंगावर बंदूक ताणल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. बंदूक ज्या इसमानं ताणली आहे, त्यानं डोक्यावर टोपीदेखील घातली होती. बंदूक ताणणाऱ्याच्या तोंडावर मास्क होता, तर बॅग हातात असलेला दुसरा चोरट्यानं मास्क घातलेला नाही आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हातात बँग असलेला माणूस स्पष्टपणे कैद झाला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. यानंतर 24 तासांच्या आतच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नाका बंदी करून तीन चोरट्यांना करुंदा पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कला यांनी दिली आहे.
नेमकी किती रक्कम या चोरट्यांनी बँकेतून पळवली, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेमुळे हिंगोलीतील सगळ्यात बँकेत काम करणारे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. बँकेत होणाऱ्या चोरीच्या घटनांची गेल्या काही काळात वाढ झाली असून अशीच घटना काही दिवसांपूर्वी मुंबईतील दहीसरच्या एसबीआय ब्रांचमध्येही घडली होती. यात बँकेतील गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला होती. अशातच आता हिंगोलीतही अशाच पद्धतीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, बँक लुटून पळ काढताना अवघ्या काही तासांत पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं
SBI बँकेत गोळीबार, दहिसर शाखेतला एक कर्मचारी ठार, 2.50 लाख लुटून दोघे फरार
सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा, सात लाखांची लूट