Jharkhand: झारखंडमध्ये जबरदस्तीने बीफ खायला देण्याचा प्रकार, विरोध केल्यामुळे…
तलवार दाखवून जबरदस्तीने बीफ खायला लावलं, विरोध करताच....
झारखंड: झारखंड (Jharkhand) राज्यात दोन ठिकाणी बीफ (Beef) खायला देण्याची प्रकरणं उजेडात आली आहेत. जबरदस्तीने बीफ खायला लावल्यामुळे त्या नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये (Police station) तक्रार दाखल केली आहे. पहिली घटना हजारीबाग (Hazaribagh)या जिल्ह्यातील बरियठ बिरहोर टोला या गावातील आहे. दुलमाहा गावातील खलील मियां या व्यक्तीने मागच्या चार दिवसापूर्वी संपुर्ण गावाला माझ्याकडून जेवणं असल्याचं सांगितलं.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, खलील मियां या व्यक्तीने जेवणासाठी आलेल्या लोकांना पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात दारु पाजली. त्यानंतर त्याने शिजवलेलं बीफ लोकांना खायला दिलं. ज्यावेळी लोकांना ते बीफ असल्याचं जाणवलं, त्यावेळी लोकांनी खायला नकार दिला. परंतु तलवारीचा धाक दाखवून लोकांना ते अन्न खायला लावलं असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी चौकशीसाठी खलील मियां यांचं घर गाठलं. त्यावेळी त्यांना तिथं बीफ सापडलं, त्यानंतर पोलिसांनी खलील मियां याला ताब्यात घेतलं आहे.
दुसरी घटना साहिबगंज जिल्ह्यातील तालबन्ना गावातील आहे. चंदन रविदास या गावातील तरुणाने राधानगर पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आहे. मिठुन शेख, नसीम शेख, फिरोज शेख यांच्यासह आणखी पाच लोकांनी 31 डिसेंबरला जबरदस्तीने बीफ खायला दिलं आहे. विशेष म्हणजे विरोध केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यामध्ये चंदन रविदास याच्या हात फ्रॅक्चर झाला आहे.पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे.