जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदला होता, खेळता खेळता चिमुकले खड्ड्याजवळ गेले अन्…

जलवाहिनी दुरुस्तीसाठी नेवाळी परिसरात खड्डा खोदला होता. खड्डा वस्तीजवळ असल्याने वस्तीतील दोन चिमुकली खेळता खेळता खड्ड्याजवळ गेली, ती परतलीच नाही.

जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डा खोदला होता, खेळता खेळता चिमुकले खड्ड्याजवळ गेले अन्...
अंबरनाथमध्ये खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:56 PM

अंबरनाथ / निनाद करमरकर : जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. अंबरनाथच्या नेवाळी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे नेवाळी परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुकल्यांच्या अचानक जाण्याने दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदला होता खड्डा

अंबरनाथच्या नेवाळी परिसरात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पाणी देखील साचलं होतं. मात्र खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपायोजना किंवा बॅरिकेडिंग केलेली नव्हती. खड्ड्याजवळ वस्ती असल्याने वस्तीतील 8 वर्षाचा आणि 6 वर्षाचा अशी दोन लहान मुले खेळता खेळता खड्ड्याजवळ गेली.

खेळताना तोल जाऊन खड्ड्यात पडले

खेळत असताना तोल जाऊन दोघेही खड्ड्यात पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे स्थानिकांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

डोंबिवली-बदलापूर राज्य महामार्ग रोखला

ठेकेदाराच्या चुकीमुळे दोन लहान मुलं बुडाल्याने संतप्त नातेवाईकांनी डोंबिवली बदलापूर राज्य महामार्ग रोखून धरला. नेवाळी, डावलपाडा परिसरात मुख्य महामार्ग रोखला. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि रस्ता मोकळा केला.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.