इमारतीचा काही भाग थेट अंगावर आल्याने दोघांचा मृत्यू, महापालिका म्हणते…
मुंबईत इमारतीचा काही भाग दोन लोकांच्या अंगावर कोसळल्याने दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. जखमी दोघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यावेळी इमारत कोसळल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी लोकांची तिथं मोठी गर्दी झाली होती.
मुंबई : मुंबईतील विलेपार्ले (Vile Parle) गावठाण भागातील नानावटी रुग्णालयाजवळील सेंट ब्राझ रोड जवळील दोन मजल्यांच्या इमारतीचा तळ आणि पहिला मजला (building collapses) काल दुपारी कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी परिसरातील सगळी लोकं त्या आवाजाने घाबरुन गेली. पोलिस आणि अग्नीशमन दलाला तिथं धाव घेतली. त्या दुर्घटनेत दोन जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी (building collapsed at St. Braz Road near Nanavati Hospital in Vile Parle) असल्याची माहिती मिळाली आहे.
माहिती मिळताचं अधिकारी…
महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे की, त्यांना काल दुपारी विलेपार्ले गावठाण भागातील नानावटी रुग्णालयाजवळील सेंट ब्राझ रोड येथील दोन मजली इमारती कोसळली असल्याची माहिती मिळाली. “ज्यावेळी दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली, त्यावेळी तातडीने तिथं मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. ही माहिती तिथल्या जवळच्या पोलिस स्टेशनला कळवण्यात आली. इतर अधिकारी सुध्दा मदतीसाठी तिथं धावून गेले. तिथं काहीवेळाने रुग्णवाहिका, पालिका कर्मचारी सुध्दा मदतीसाठी दाखल झाले होते.”
दोघांचा जागीचं मृत्यू
कूपर रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं होतं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. प्रशिला मिसौता (६५) आणि रॉबी मिसौता (७०) अशी त्यांची नावं आहेत. दोन जखमींवरती कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घाटकोपरमध्ये सुध्दा इमारत कोसळली
काल घाटकोपरच्या राजावाडी परिसरात आणखी दुर्घटना घडली आहे. तिथं सुध्दा बिल्डींगचा काही भाग कोसळला आहे.
मुंबईत दोन दिवसापूर्वी मान्सून पाऊस सुरु झाला आहे. कालपासून पावसाचा जोर सुध्दा वाढला आहे. पावसाच्या सुरुवातीला अशा पद्धतीच्या दोन दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.