स्वच्छता करताना निघाला विषारी वायू, सेफ्टिक टँक बनला काळ

| Updated on: Jul 30, 2023 | 7:56 PM

, ठेकेदाराने सफीकूलला सेफ्टिक टँकमध्ये उतरण्यास सांगितले. काही वेळानंतर त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. इतरांना त्याची चिंता वाटू लागली.

स्वच्छता करताना निघाला विषारी वायू, सेफ्टिक टँक बनला काळ
Follow us on

कोलकाता : कोण दिवस कसा येईल, काही सांगता येत नाही. मजुर पोट भरण्यासाठी घराबाहेर पडतात. पण, संकट आल्यास त्यांना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना समोर आली आहे. सेफ्टिक टँकवर काम करत असताना दोन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम बंगालच्या वीरभूम येथील पैकार ठाण्याअंतर्गत नयाग्राम येथे घडला. सफीकुल शेख आणि गोलशाहनूर शेख अशी मृतकांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी वीरभूमच्या खोईराशोल भागात तीन जण सेफ्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी बीबबल बाद्यकर (वय ४५), सनातन धीबर (वय ४८) आणि अमृत बागडी (वय ३२) यांचा मृत्यू झाला होता.

धौली ठाण्याअंतर्गत रघुनाथगंज भागात घर बांधकाम सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, ठेकेदाराने सफीकूलला सेफ्टिक टँकमध्ये उतरण्यास सांगितले. काही वेळानंतर त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. इतरांना त्याची चिंता वाटू लागली. तो तिथं मूर्छित पडला. गोलशाहनूर शेख त्याच्या शोधासाठी खाली उतरला. आतमध्ये तोही मूर्छित पडला.

इतर साथीदारांनी गोलशाहनूरच्या सेफ्टिक टँकमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्या दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. घटनेची माहिती धौली पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपास सुरू केला. दोन्ही मजुरांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आले.

वीरभूममध्ये तणाव

दोघांच्याही कुटुंबीयांनी स्थानिक प्रशासनाला दोघांचेही मृतदेह परत आणण्याची विनंती केली. बांग्ला सांस्कृतिक मंचाचे जिल्हा सचिव शेख रीपन म्हणाले, प्रशासन मृतदेहांना त्यांच्या गावी घेऊन जाणार आहे.

दोघांचेही कुटुंबीय दुःखी

मजूर जंगल महाल भागात काम करण्यासाठी आले होते. परंतु, दोन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गोंधळ उडाला. मृतकांचे कुटुंबीय म्हणाले, आम्ही पोरांना दुसऱ्या राज्यात कमाईसाठी पाठवले होते. परंतु, त्यांचा असा मृत्यू होईल, याचा विचार केला नव्हता. दोन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबीय अतिशय दुःखी आहेत.