धक्कादायक !’प्ले ग्रुप’च्या त्या मुलांमध्ये वागण्यात बदल जाणवला, चौकशीनंतर अखेर 2 शिक्षिका अटकेत

चिमुकले नेहमीप्रमाणे शाळेत जायचे, पण शाळेतून येताच गप्प गप्प रहायचे. कुणाशी काही बोलायचे नाहीत. पालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारणा केली.

धक्कादायक !'प्ले ग्रुप'च्या त्या मुलांमध्ये वागण्यात बदल जाणवला, चौकशीनंतर अखेर 2 शिक्षिका अटकेत
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 8:15 PM

गोविंद ठाकूर, मुंबई : चिमुकली मुलं दररोज शाळेत जायची. शाळेत जाऊ लागल्यानंतर काही दिवसांनी मुलांमध्ये अचानक बदल जाणवू लागला. पालकांना आपल्या मुलांमधील बदल जाणवू लागला. मात्र नक्की कळत नव्हते की काय झालं. मुलं शाळेतून आल्यानंतर गप्प रहायची, मोकळं बोलत नव्हती. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांची विचारपूस केली असता मुलांनी जे सांगितलं त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पालकांनी थेट संस्था चालकांची भेट घेतली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत अखेर दोघींना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिक्षकांकडून मुलांना अमानुष वागणूक

कांदिवली येथील रायम्स अॅण्ड रम्बल्स या ‘प्लेग्रुप’ मध्ये लहान मुलांना अमानुष शिक्षा देणाऱ्या दोन शिक्षिकांना अखेर बुधवारी अटक करण्यात आली. मुलांना चिमटे काढणे, हाताला मिळेल त्याने मारहाण, मुलांना उचलून आपटणे अशी क्रूर वागणूक या दोन शिक्षिकांनी दिली होती. त्यांची ही अमानुष वागणूक सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर दोन शिक्षिकांविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अभिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमानुष घटना कैद

कांदिवली पश्चिमेकडे रायम्स अॅण्ड रम्बल्स प्लेग्रुप असून, यामध्ये कांदिवली परिसरातील 28 मुले शिकण्यासाठी जातात. दोन ते अडीच वर्षांच्या मुलांच्या वागणुकीत अचानक बदल जाणवू लागल्याने पालकांनी संस्थाचालकांची भेट घेतली. त्यानंतर 1 मार्चपासून 27 मार्चपर्यंतच्या कालावधीतील प्लेग्रुपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मुलांच्या गालाला जोरात चिमटे काढणे, हात धरून त्यांना फरफटत नेणे आणि तरीही मुले ऐकली नाहीत तर त्यांना हाताने मारहाण करणे, पुस्तकाने मुलांच्या डोक्यावर जोरजोरात मारणे असे प्रकार शिक्षिका करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. संस्थाचालकांनी याबाबतचे फुटेज दिल्यानंतर पालकांनी त्याआधारे कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. कांदिवली पोलीस ठाण्यात दोन्ही शिक्षिकांविरुद्ध 2 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी शिक्षिकांची पोलीस कोठडीत रवानगी

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास केला. सीसीटीव्ही फुटेज, पालक तसेच संस्थाचालकांचे जबाब, साक्षीदार त्याचप्रमाणे इतर पुरावे जमा करून या दोन्ही शिक्षिकांना अटक केली. जिनल छेडा आणि भक्ती शहा अशी अटक केलेल्या शिक्षिकांची नावे असून, न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.