तीन तरुणांची घट्ट मैत्री…फेसबूकला कमेंटचा नेहमी वर्षाव व्हायचा. पण… नंतर जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल’
मुन्ना निषाद, नरसिंग निषाद यांच्यासह मयत संतोषचा मित्र असलेल्या लखनच्या फेसबूक पोस्टला संतोष वारंवार कमेंट करत असे, त्यावरून मुन्ना आणि रामकृष्ण निषाद यांच्यात कायम वाद व्हायचा.
नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात सलग दोन दिवस खुनाच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातपुरच्या काश्मिरे मळे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेने तर शहरात खळबळच उडाली आहे. खरंम्हणजे मुलगी सारखी घरातून निघून जाते म्हणून वडिलांनी मुलीचा गळा आवळून मारून टाकल्याची बाब ताजी असतांना दोघा मित्रांनी तिसऱ्या मित्राला संपवल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरातील काश्मिरे मळा परिसरात चाळीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हा खून झाला होता. मात्र, यामागील कारण काय याबाबत स्पष्टता येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र खुणाचं कारण जवळपास निश्चित झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
धारधार शस्राने वार करून संतोष जयस्वाल या तरुणांची त्याच्याच दोन मित्रांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. ते दोघेही फरार असून नाशिक पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
मुन्ना निषाद, नरसिंग निषादयांच्यासह मयत संतोषचा मित्र असलेल्या लखनच्या फेसबूक पोस्टला संतोष वारंवार कमेंट करत असे, त्यावरून मुन्ना आणि रामकृष्ण निषाद यांच्यात कायम वाद होत असायचा.
संतोष आणि मुन्ना निषाद, नरसिंग निषाद यांच्यात याच कारणावरून वाद सुरू असतांना संतोष डोक्यात दोघांनी लोखंडी रॉड टाकला, यामध्ये संतोषचा मृत्यू झाला आहे.
लखणच्या फेसबूक पोस्टला मयत संतोष कायम कमेंट करत असल्याने दोन मित्रांमध्ये वाद होत असल्याने झालेल्या वादात एका मित्राचा खून झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली आहे.
सातपुर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे. नाशिक पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
क्षुल्लक कारणावरून झालेली हत्या नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरत असली तरी दुसरीकडे सलग दोन खुनाच्या घटनांनी शहरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.