Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल चायनीजसमोर भयंकर थरार…टिप मिळताच दोघांच्या मुसक्या आवळल्या; पोलिसांनी लढवली अफलातून शक्कल

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात कोयतेधारी गुंडाचा नंगानाच सुरु झाल्यानंतर पोलीसांनी आता कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील कोयतेधारी गॅंगची दहशत शहरी भागातून आता ग्रामीण भागात पोहचली आहे. कारण पुण्याच्या हवेली तालुक्यातील कोपरगावाच्या हद्दीतून दोघा गुंडांना पोलीसांनी गुप्त माहीतीच्या आधारे जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

हॉटेल चायनीजसमोर भयंकर थरार...टिप मिळताच दोघांच्या मुसक्या आवळल्या; पोलिसांनी लढवली अफलातून शक्कल
Pune crimeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 8:29 PM

विनय जगताप, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, पुणे | 17 फेब्रुवारी 2024 : पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील कोयते गॅंग नावाने कुप्रसिद्ध असलेल्या गुंडांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातून एका दुकलीला दोन कोयते आणि कार तसेच पाच लाख रुपयांच्या मुद्देमालासह उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी 200 गुंडाची ओळख परेड काढून गुन्हेगारी टोळ्यांना इशारा दिला होता. यानंतर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टासमोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या गाडीत दोघे जण कोयते बाळगून बसले आहेत, अशी माहिती शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पोलिसांना आपल्या गुप्त खबऱ्याकडून मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून तेथे लाल रंगाची चारचाकी गाडीतून कोयते गॅंगच्या दोघांना शस्रास्रांसह ताब्यात घेतले.

आठ दिवसात दुसरी घटना

उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव गावच्या हद्दीतील हायवे रोड लगतच्या हॉटेल चायनीज कट्टासमोरून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. चंद्रशेखर दाजी चोरमुले ( वय – 29, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली ) आणि आकाश मधुकर लांडगे ( वय -19, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली ) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक चारचाकी गाडी असा 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोयता गँगमधील गुन्हेगारांना शहर पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर आता कोयता गॅंगचे लोन ग्रामीण भागात पोहोचलं आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.