मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी युनिटने (एएचटीयू) एका हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी एका ब्युटीशियनने अल्पवयीन मुलीला 2 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. संशयित महिला कविता शंकर प्रजापती सिंग उर्फ रितू ही उल्हासनगर येथील रहिवासी आहे. आरोपी महिलेला गुरुवारी काशिमिरा येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. कारवाईच 15 आणि 19 वर्षे वयोगटातील दोन मुलींची सुटका करून त्यांना वेलफेअर होममध्ये पाठवण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या तस्करीमध्ये एक महिला सक्रियपणे सहभागी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार AHTU टीमने पद्धतीरपणे प्लान करुन एका प्रवक्त्याला नेमले ज्याने महिलेशी संपर्क करून महिलेशी करार केला. खात्री केल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून रितूला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रितू डोंबिवलीतील एका युनिसेक्स पार्लरमध्ये काम करते, जिथे ती संभाव्य ग्राहक शोधत असे, असे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, महिलेविरोधात भारतीय दंड संहिता, अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (PITA) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे कडक संरक्षण कायदा (POCSO) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण काशिमीरा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. काशिमीरा पोलीस पुढीस तपास करत आहेत.