पाणीपुरीवरून रणकंदन.. लाठीमार, दगडफेक आणि गोळीबारही.. नेमकं काय झालं ?

पाणीपुरी... बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आणि वीकपॉईंट.. अनेक लोकं दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पाणीपुरी खाण्यास तयार असता. पण याच पाणीपुरीवरून कानपूरमध्ये अक्षरश: रणकंदन माजलं. पाणीपुरी खाण्याच्या मुद्यावरून झालेला वाद एवढा वाढला तिथे दणादण गोळीबार झाला.

पाणीपुरीवरून रणकंदन.. लाठीमार, दगडफेक आणि गोळीबारही.. नेमकं काय झालं ?
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 10:46 AM

पाणीपुरी… बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आणि वीकपॉईंट.. अनेक लोकं दिवसाच्या कोणत्याही प्रहरी पाणीपुरी खाण्यास तयार असता. पण याच पाणीपुरीवरून कानपूरमध्ये अक्षरश: रणकंदन माजलं. पाणीपुरी खाण्याच्या मुद्यावरून झालेला वाद एवढा वाढला तिथे दणादण गोळीबार झाला आणि एक डझनहून अधिक लोक जखमी झाले. खरंतर , बुधवारी सायंकाळी राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. रिपोर्टनुसार, वादानंतर काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानावर हल्ला केला, ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला. याचदरम्यान, छतावर चढलेल्या घरमालकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले , मात्र कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

या घटनेतील एका पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 9 लोकांविरुद्ध आणि 10 अज्ञााताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जमावातील लोकांनी दगड फेकले आणि गोळीबार केल्याचा आरोप आहे. यावेळी अनियंत्रित जमावाने चौकाचौकात असलेल्या दुकानात व घरात घुसून महिला व लहान मुलांना मारहाण केली.

या घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलिस तेथे दाखल झाले असता काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर रोशनी गावातील रहिवासी सत्यम सिंह राजेंद्र हे पाण्याची बाटली घेण्यासाठी चौकात कारमधून खाली उतरले होते. तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेला गंगा सिंग नावाचा तरुण गाडीजवळ पाणीपुरी खात होता. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली, त्यानंतर हाणामारी झाली. यानंतर नीलम सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर्यनगर येथील रहिवासी दीपू, हरिशंकर, लाला तांडिया, लालू, हरिकिशन, सुनील, कल्लू, गंगा सिंग, लल्लन आणि १० अज्ञात लोकांविरुद्ध रानिया पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी शेकडो लोकांनी दुसऱ्या पक्षाच्या दुकानावर हल्ला केला. आपल्याविरोधात चुकीचा अहवाल लिहिण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यावेळी दुकानाच्या आजूबाजूला जो कोणी दिसला त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर दुकानमालक रवी गुप्ता यांनी टेरेसवर त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.