Titwala : टिटवाळ्यात तरूणांच्या दोन गटात बाचाबाची, रात्री खरंच झाला का गोळीबार ?
टिटवाळ्यातील (Titwala) वाजपेयी चौकातून (Vajapeya Chowk) बल्याणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रवींद्र आर्केडसमोर काही तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर एका ग्रुपमधील तरुणाने गोळीबार केल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून पोलिस कसून चौकशी करीत असल्याची माहिती समजली आहे.
टिटवाळा : टिटवाळ्यातील (Titwala) वाजपेयी चौकातून (Vajapeya Chowk) बल्याणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रवींद्र आर्केडसमोर काही तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर एका ग्रुपमधील तरुणाने गोळीबार केल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून पोलिस कसून चौकशी करीत असल्याची माहिती समजली आहे. ज्यावेळी चौकात वादावादी झाली, त्यावेळी काही तरूण ओरडत टिटवाळा पोलिस स्टेशनकडे (Titwala Police Station) पळाले. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती.
नेमकं काय झालं
तरूणांच्या दोन गटात बाचाबाची सुरू होती. त्यावेळी एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. ज्यांच्यावर गोळीबार केला गेला ते मोठ-मोठयाने आरडा-ओरडा करत टिटवाळा पोलिस ठाण्याच्या दिशेने धावत सुटले. कुणी कुणावर गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकीतील पुंगळी रस्त्यावर पडलेली आढळून आली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपींना कलम 325, 425 अंतर्गत अटक केली आहे. तर गोळीबार झाला नाही असे टिटवाळा पोलीसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अधिक तपास करत असून अधिक माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
bjp mla ganesh naik : अटकपूर्व जामिनासाठी गणेश नाईकांची धावाधाव, ठाणे सत्र न्यायालयात अर्ज, नाईकांवर अटकेची टांगती तलवार
Baramati Raju Shetti : विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत; राजू शेट्टींचा बारामतीत हल्लाबोल
Devendra Fadnavis: राऊतांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, देवेंद्र फडणवीसांचा चिमटा
;