चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार द्या, कळंबा जेल शिपायाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या

पोलीस शिपायाच्या बुटाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या मिळून आल्याने कळंबा कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार द्या, कळंबा जेल शिपायाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या
कळंबा जेल, कोल्हापूर
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 11:02 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृह (Kalamba central Jail) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा हे कारागृह चर्चेत आलं आहे. पोलीस शिपायाच्या बुटाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या मिळून आल्याने कळंबा कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या चिठ्ठ्यांमध्ये माझे अर्जंट काम आहे, ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार रुपये द्यावेत असा उल्लेख आहे.

विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांमध्ये ज्या कैद्यांची नावे आहेत, त्यांनी या चिठ्ठ्या लिहिल्या नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ज्या शिपायाच्या सॉक्समध्ये या चिठ्या आढळून आल्या आहेत, त्या शिपायाचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यलयाला पाठविण्यात आला आहे. कळंबा कारागृहामध्ये कैद्यांच्या झाडाझडतीत मोबाईलसह इतर वस्तू वारंवार आढळून येत असल्यामुळे, कारागृह प्रशासनाने काही संशयित कारागृह शिपायांची झडती घेतली. त्यावेळेला हा प्रकार समोर आला.

कैद्यांकडे मोबाईल सापडण्याची परंपरा

कळंबा कारागृहात नेहमी कैद्यांकडे मोबाईल सापडतात. एक-दोनदा नव्हे तर असे असंख्य प्रकार घडले आहेत. त्यामुळे या जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल सापडण्याची एक परंपराच असल्याचं चित्र आहे. गेल्याच महिन्यात कारागृहात पुन्हा एकदा दोन मोबाईल, सिम कार्ड आणि बॅटरी आढळून आली होती. मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या 5 जणांकडून मोबाईल फोनचा वापर सुरु असल्याचं बराक झडतीत उघडकीस आलं होतं. रिकाम्या दुधाच्या पिशवीत गुंडाळून हे मोबाईल शौचालयाच्या पाण्यात ठेवले जात असल्याचा संशय कारागृह पोलिसांना आहे.

पाऊण किलो गांजा आणि 10 मोबाईल!

डिसेंबर 2020 च्या शेवटी कळंबा कारागृहात पाऊण किलो गांजासह 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह असलेले तीन पॅकेट असा 15 हजाराहून अधिकचा मुद्देमाल कारागृह पोलिसांना मिळाला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासन खडबडून जागं झालं होतं.

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा

यापूर्वी या जेलमध्ये टेनिस बॉलमधून गांजा पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने गांजा कारागृहात पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये हा प्रकार घडला होता.

(two letters found in policemans sox at Kolhapur Kalamba central Jail)

संबंधित बातम्या 

कळंबा कारागृह की गुन्हेगारीचा अड्डा? पुन्हा सापडले दोन मोबाईल आणि सिम कार्ड! 

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.