शाहरुख खान याच्या मन्नतची दोघा युवकांनी भिंत तोडली; कारण विचारले असता त्यांनी सांगितले…
वांद्रे पोलिसांनी देत असताना त्यांनी सांगितले की, 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे.
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याची भिंत फोडून प्रवेश करणाऱ्या दोन युवकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची भिंत फोडून प्रवेश केल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भिंत तोडल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वांद्रे पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी गुरुवारी दोघांना शाहरुख खानच्या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणीचा माहिती वांद्रे पोलिसांनी देत असताना त्यांनी सांगितले की, 19 ते 20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
त्यानंतर चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितले की, आपण दोघे गुजरातमधून आलो असून आणि त्यांना शाहरुखला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र तरीही या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून या दोघा युवकांकडे असलेल्या मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
गुजरातच्या या युवकांनी शाहरुख खानच्या बंगल्या कोणतीही परवानगी न घेता आणि थेट भिंत तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर गुन्हा नोंद करून या दोन्ही मुलांचा मोबाईल आणि इतर साहित्याची तपासणी सुरु करण्यात आली आहे.