बारावीचा गणिताचा पेपर फोडणारा मुख्य सुत्रधार कोण ? सात जणांना घेतलंय ताब्यात
बारावीचा गणिताचा पेपर फोडल्या प्रकरणी आणखी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची एकूण संख्या झाली सात झाली आहे. पाच आरोपींना दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : राज्यभर गाजलेल्या इयत्ता १२ वीच्या गणित पेपरफुटी प्रकरणी (In the paper leak case) अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना न्यायलयाने १० पर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. तर रात्री उशीरा आणखी दोन आरोपी शिक्षकांना लोणार भागातून साखर खेर्डा पोलिसांनी (KARDA POLICE) अटक केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपींची संख्या सात झाली आहे. मात्र ह्या प्रकरणाचे धागेदोरे तपासत असताना पोलीस (BULDHANA POLICE) ह्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण ? त्यापर्यंत अद्यापही पोहोचण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना ३ मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यात घडली होती. तो पेपर ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पेपर फुटल्याच्या प्रकरणाची विधी मंडळात सुद्धा चर्चा झाली. यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला होता. शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार दिल्यावर चौकशी केली असता, त्याच्या कड्या जुळवत खाजगी संस्थाचालक असलेले शिक्षक गजानन आडे, गोपाल शिंगणे, यांच्यासह गणेश पालवे, पवन नागरे, आणि गणेश नागरे या पाच जणांना आरोपी ठरवत अटक करण्यात आली आहे.
ह्या पाचही आरोपींना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व होत असतांनाच रात्री उशीरा लोणार येथील शाळेवर कार्यरत असलेल्या शेख अकील शेख मुनाफ, आणि अंकुश पवार ह्या दोघांना रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे आता याप्रकरणात आरोपींची संख्या सात झाली आहे.
या प्रकरणातला मुख्य सुत्रधार कोण आहे, याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. परंतु पोलिसांना अद्याप या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयश आले आहे.