किरकोळ मारहाणीचं कारण, सांगलीत भयानक रक्तपात, दोघांचा खून, नेमकं काय घडलं?

कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे झालेल्या किरकोळ मारहाणीच्या कारणावरुन उफाळलेल्या हाणामारीत संदीप भानुदास चव्हाण आणि विजय नानासाहेब माने या दोघांचा खून झाला आहे.

किरकोळ मारहाणीचं कारण, सांगलीत भयानक रक्तपात, दोघांचा खून, नेमकं काय घडलं?
किरकोळ मारहाणीचं कारण, सांगलीत भयानक रक्तपात, दोघांचा खून
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 8:54 PM

सांगली : सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन ते चार जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीची घटना मारहाण झालेल्या व्यक्तीच्या मुलाला माहिती पडली. या घटनेची माहिती मिळताच मुलाच्या तळपायाची आग मस्तिष्कात गेली. त्याने मागचापुढचा कोणताही विचार न करता चौघांचा बदला घेण्याचं ठरवलं. त्याने आपल्यासोबत एका मित्राला घेतलं. त्यानंतर चौघांना रक्तबंबाळ करेपर्यंत मारलं. यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना ही सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे घडली. या घटनेमुळे विहापूर गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विहापूर या गावाची शांतताप्रिय म्हणून ओळख आहे. पण या घटनेमुळे गावाची शांतता भंग पावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे झालेल्या किरकोळ मारहाणीच्या कारणावरुन उफाळलेल्या हाणामारीत संदीप भानुदास चव्हाण आणि विजय नानासाहेब माने या दोघांचा खून झाला आहे. तर गणेश सतीश कोळी आणि गोरख महादेव कावरे हे जखमी झाले आहेत. या खून प्रकरणी संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे आणि विशाल तानाजी चव्हाण यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केलीय. तर विशाल चव्हाण हा फरार आहे. ही घटना काल (29 ऑक्टोबर) शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या दुहेरी खून प्रकरणाने तालुका हादरला आहे.

नेमकं काय घडलं?

विहापूर येथील गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी काल (28 ऑक्टोबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. तर गणेश, विजय आणि गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मधुकर याने आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेवून विजय माने, गणेश कोळी, गोरख कावरे यांना लाकडी दांडके, काठी आणि ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

दोघांचा मृत्यू

आरोपी मधुकर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने विजय, गणेश आणि गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलावलं. मधुकर मोरे आणि विशाल चव्हाण या दोघांनी त्याला लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विजय माने हाही गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मुख्य संशयित आरोपीला बेड्या

या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तसेच पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याच्या मुसक्या आवळल्या. तर दुसरा संशयित आरोपी विशाल तानाजी चव्हाण याच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. विहापूर हे शांतताप्रिय गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. परंतु येथे आता दुहेरी खून प्रकरण घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

चोरी करायला दुकानात शिरला, दुकान जाळून खाक केलं, पोलिसांनी पकडलं तेव्हा तर….

जालन्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई, बँकेत घुसून पिस्तूलीचा धाक दाखवणारे दरोडेखोर अखेर जेरबंद, वाचा थरार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.