कारला धक्का लागल्याचा राग, संतापलेल्या कार चालकाने काका-पुतण्यासोबत केले ‘हे’ कृत्य

मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन टेम्पो चालक हर्षद रसाळ आणि त्याचे काका बंडू रसाळ हे डोंबिवली पुर्वेतून चालले होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका चारचाकी कारला त्यांच्या टेम्पोचा धक्का लागला.

कारला धक्का लागल्याचा राग, संतापलेल्या कार चालकाने काका-पुतण्यासोबत केले 'हे' कृत्य
डोंबिवलीत कारला धक्का लागल्याच्या कारणातून दोघांना मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:43 PM

डोंबिवली : कार (Car)ला धक्का लागल्याने चिडलेल्या कार चालकाने साथीदारांसह टेम्पोमधील काका-पुतण्याला चाकूने वार करुन गंभीर जखमी (Injured) केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. हर्षद रसाळ आणि बंडू रसाळ अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत. पंडित म्हात्रे असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील सोनरपाडा परिसरात रविवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला आहे.

मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन टेम्पो चालक हर्षद रसाळ आणि त्याचे काका बंडू रसाळ हे डोंबिवली पुर्वेतून चालले होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका चारचाकी कारला त्यांच्या टेम्पोचा धक्का लागला.

वादानंतर टेम्पो चालकासोबत मारहाण

याच कारणावरून कार चालक पंडित म्हात्रे आणि टेम्पो चालक हर्षद रसाळ यांच्यात वाद झाला. हा वाद बघून हर्षदचा काका बंडू रसाळ मध्यस्थी करण्यास गेला.

हे सुद्धा वाचा

याच गोष्टीवरून कार चालक पंडित म्हात्रेला राग आला आणि त्याने फोन करून तीन लोकांना बोलावून घेतले. यानंतर हर्षद व त्याचा काका बंडू यांना बेदम मारहाण केली.

नागरिकांनी जखमींना रुग्णालयात केले दाखल

संतापलेला कार चालक इतक्यावरच थांबला नाही तर गाडीला धक्का दिला म्हणून दोघांवर चाकूने सपासप वार करत दोघांना गंभीर जखमी करुन पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी दोन्ही जखमी काका पुतण्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

काकाची प्रकृती गंभीर

काका बंडू रसाळ यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कार चालकासह इतर तीन जणांवर गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फरार कार चालकाचा शोध सुरू केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.