सांगली : मुले चोरणारी टोळी समजून जत तालुक्यातील लवंगा येथे साधूंना मारहाण (Beating) केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक (Arrest) केले आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी दोघे जण काँग्रेसचे कार्यकर्ते (Congress Activist) आहेत. आमसिध्दा तुकाराम सरगर, लहु रकमी लोखंडे, मुत्याप्पा वडीयार, नागराज पवार, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी सिधराम सरगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी आमसिद्धा सरगर आणि लहु लोखंडे हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
आमसिध्दा तुकाराम सरगर हा लवंगा गावच्या काँग्रेसच्या सरपंच बायक्का तुकाराम सरगर यांचा मुलगा आहे. तर लहू रकमी लोखंडे हा माजी सरपंच आहे.
उत्तर प्रदेशील चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक काल लवंगा गावात घडला होता.
कर्नाटकमधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चौघा साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
या प्रकरणात साधूंची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी फिर्याद दिली नाही. त्यांच्यावरती उपचार करून ते पुढे पंढरपूरकडे रवाना झाले. मात्र पोलिसांनी याची दखल घेत सहा जणांना अटक केली आहे.
हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपाच्या राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत. साधूंना मारहाण करणे अयोग्य असून मारहाण करणे चुकीचे आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
साधूंना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली याचा निषेध आहे. खरंतर महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे हे निंदनीय आणि निषेधार्थ आहे. याचा जाहीर निषेध आम्ही करतो.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.