अक्षयने मारलेली गोळी API निलेश मोरेंच्या मांडीतून आरपार, दोन पोलिसांचा वाढला BP, रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉलवर हिसकावून गोळीबार केला तेव्हा एपीआय निलेश मोरे जखमी झाले. त्यांच्या पायातून गोळी आरपार गेली. हे पाहून पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बीपी वाढला आणि त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने स्वयंस्वरक्षणासाठी अक्षयच्या दिशेला गोळी झाडली. त्यात अक्षयचा मृत्यू झाला.

अक्षयने मारलेली गोळी API निलेश मोरेंच्या मांडीतून आरपार, दोन पोलिसांचा वाढला BP, रुग्णालयाकडून महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 10:10 AM

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. या घटनेविषयी आणखी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या एका प्रकरणातील रिमांडसाठी एक विशेष पथक तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे येथे नेत असताना अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कंबरेला असलेली सर्व्हिस रिव्होल्वर खेचून घेतले. त्यानंतर त्याने पोलीस पथकाच्या दिशेने 3 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि 2 राऊंड इतरत्र फायर झाले. स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 1 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे यास लागून तो जखमी झाला. यावेळी पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यामुळे अक्षय शिंदे सोबत तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना कळवा येथील रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. यावेळी अक्षयचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. तसेच तीनही पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अक्षय शिंदेने केलेल्या फायरिंगमध्ये गोळी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायातून आरपार निघून गेली. यावेळी घटनेनंतर गाडीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. या घटनेत अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटना ही काल संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी घडली. या घटनेनंतर 6 वाजून 35 मिनिटांनी तीन जखमी पोलीस आणि आरोपी अक्षयचा मृतदेह घेऊन पोलीस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आले. कळवा येथील रुग्णालयात निलेश मोरे यांना झालेली दुखापत लक्षात घेता त्यांच्यासह दोघांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कळवा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधला जातोय. आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे होती, अशी विरोधकांची मागणी आहे. या एन्काउंटरच्या माध्यमातून सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्यानंतर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. नवी मुंबईचे सीआयडी अधिक्षक हे तपासाचे प्रमुख असणार आहेत. विशेष म्हणजे तपासासाठी सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.