शिर्डीला सायकलवर दर्शनाला जात होते…पण वाटेतच साई भक्तांवर काळाचा घाला, नेमकं काय घडलं ?
सिन्नरच्या पाथरे येथे झालेल्या अपघातात आदित्य महेंद्र मिठे आणि कृष्णा संतोष गोळेसर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या साईभक्तांची नावे आहेत.
सिन्नर, नाशिक : शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठी सायकलवर जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे. या घटणेने सिन्नरसह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे गावाजवळ सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सिन्नर मधील काही तरुण हे सायकलवरुन शिर्डीच्या दिशेने दर्शनासाठी जात होते. अशातच भरधाव वेगाने महिंद्रा एसयूव्ही या वाहनाने या पाच सायकल स्वारांना चिरडले आहे. असून त्यात दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर जवळच असलेल्या नाल्यात ही कार उलटली होती. भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने पाच साईभक्तांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर दोघे गंभीर जखमी आहे. सिन्नर ते शिर्डी रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्याने या अपघातानंतर सिन्नर-शिर्डी हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सिन्नरच्या पाथरे येथे झालेल्या अपघातात आदित्य महेंद्र मिठे आणि कृष्णा संतोष गोळेसर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या साईभक्तांची नावे आहेत.
हे पाचही साईभक्त सिन्नर शहरातील लोंढे गल्ली भागात राहणारे पाचही तरुण असून ते पहाटेच्या वेळी सायकलवरुन शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेले होते.
हे तरुण पहाटे शिर्डीच्या दिशेने जात असतांना पाथरे गावाजवळ पाठीमागून आलेल्या महिंद्रा एसयूव्ही जीप थेट या सायकल स्वारांच्या घोळक्यात शीरली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात घडल्यानंतर पाथरे गावातील तरुणांनी आणि वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली होती, जखमींना ग्रामस्थांनी रुग्णालायत दाखल केले आहे.
वावी, पाथरे, पांगरी येथील रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमी झालेल्या सर्वांना सिन्नर येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.
तिघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना मुंबईत अधिक उपचारासाठी पाठविण्याची हालचाल सुरू असून जीप चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे ज्या जीपने साईभक्तांना चिरडले आहे, ती जीप महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.