घरात एकटी असल्याची संधी साधत वृद्ध महिलेला लुटले, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच
नागपूर / सुनील ढगे : वृद्ध महिला घरात एकटी असल्याची संधी साधत दोन चोरटे तिला चाकूचा धाक दाखवून लुटून पसार झाले होते. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींची चौकशी केली असता जी माहिती समोर आली त्यानंतर पोलीसही हैराण झाले. दोघेही आरोपी […]
नागपूर / सुनील ढगे : वृद्ध महिला घरात एकटी असल्याची संधी साधत दोन चोरटे तिला चाकूचा धाक दाखवून लुटून पसार झाले होते. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींची चौकशी केली असता जी माहिती समोर आली त्यानंतर पोलीसही हैराण झाले. दोघेही आरोपी शिक्षण घेत असून, पार्टटाईम नोकरीही करतात. मात्र मौजमजेसाठी अधिक पैसे मिळवण्यासाठी ते चोरी करत होते.
चाकूचा धाक दाखवून महागडे साहित्य घेऊन पळाले
नागपूरच्या बेल तरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एक वृद्ध महिला आपल्या घरात काम करत बसली होती. यावेळी दोन युवक पल्सर गाडीवरून तिच्या घरासमोर आले. गाडी थांबवत त्यांनी घरात प्रवेश करत घरी कोणी आहे का विचारलं. महिलेने कुणी नाही म्हणताच एकाने महिलेला चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील महागडं साहित्य घेऊन पसार झाले.
जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सुदैवाने त्यांनी महिलेला काही केलं नाही. मात्र घरातील महागडं साहित्य पळवलं. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने घटनेचा तपास करत दोन्ही आरोपीने बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नागपुरातील हायप्रोफाईल परिसरात एका वृद्ध व्यक्तीच्या घरात दरोडा टाकण्याची घटना घडली होती. यानंतर आता ही घटना घडल्याने वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.