वाहने भाड्याने चालवायला घ्यायचे, नंतर परस्पर विकायचे; सातारा पोलिसांनी ‘असा’ केला आरोपींचा पर्दाफाश

नोटरी (Notary) करून चालवण्यासाठी घेतलेली वाहने परस्पर विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महाराष्ट्रसह गुजरातमधील (Gujarat) देखील काही वाहने अशाच पद्धतीने विकल्याची माहिती समोर येत आहे.

वाहने भाड्याने चालवायला घ्यायचे, नंतर परस्पर विकायचे; सातारा पोलिसांनी 'असा' केला आरोपींचा पर्दाफाश
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 7:02 PM

सातारा : नोटरी (Notary) करून चालवण्यासाठी घेतलेली वाहने परस्पर विकणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी महाराष्ट्रसह गुजरातमधील (Gujarat) देखील काही वाहने अशाच पद्धतीने विकल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींकडून 24 चारचाकी जप्त केल्या आहेत. सुमारे दोन कोटी 64 लाख रुपये इतकी या जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत आहे. उमेश चव्हाण आणि अद्बुल कादिर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी महाराष्ट्रसह (Maharashtra) गुजरातमधील गाड्यांचा हफ्ता थकलेल्या मालकांशी संपर्क साधायचे त्यानंतर आम्ही तुमच्या गाड्यांचा हफ्ता भरतो असे त्यांना सांगायचे. त्याबदल्यात नोटरी करून ते संबंधित वाहन चालवायला घ्यायचे. वाहन चालवायला घेतल्यानंतर आरोपी ते वाहन परस्पर विकून मोकळे व्हायचे. दरम्यान या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हफ्ता थकलेल्या गाड्या घ्यायचे भाड्याने

दरम्यान घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संबंधित आरोपी गाड्यांचे थकलेले हफ्ते फेडतो असे सांगून, गाड्या नोटरीवर चालवायला घ्यायचे. नोटरीवर घेतलेल्या गाड्या ते परस्पर विकून मोकळे व्हायचे. या टोळीतील दोघांना अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींकडून तब्बल दोन कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 24 गाड्या जप्त केल्या आहेत. आरोपींची अधिक चौकशी सुरू असून, या टोळीमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांंनी दिली.

महाराष्ट्रातील विविध शहरातील गाड्यांची विक्री

संबंधित आरोपींनी सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, बुलडाणा, पनवेल, ठाणे, रायगड, सांगली, गोवा आणि गुजरातच्या काही शहरांमधून वाहने परस्पर विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 24 वाहने जप्त केली आहेत.  या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Kalyan Crime : मनसे आमदारांनी भडकवल्यामुळे शेतकऱ्याने खोटी तक्रार दिली, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा आरोप

Nashik Crime : लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने घरच्यांच्या मदतीने पहिल्या प्रियकराला जिवंत जाळले, मुलीसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायक | सोनोग्राफीत चूक, सात महिन्यांची गर्भवती दगावली, नांदेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे तेलंगणातल्या डॉक्टरांवर गुन्हा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.