पालकांचे दुर्लक्ष! चिमूरड्याचा हौदात पडून मृत्यू, हृदयद्रावक घटना कुठे आणि कशी घडली ?
मागील आठवड्यातच आठ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळले होते. ही घटना ताजी असतानाच घराच्या बाजूला असलेल्या दोन वर्षीय चिमूरड्याचा हौदात पडून मृत्यू झाला आहे.
नाशिक : पालकांनो तुमच्या घरात असलेल्या लहान मुलांकडे (Child) डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवा असे सांगण्याची वेळ वारंवार येते आहे. अलिकडच्या काळात लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना वारंवार कानावर पडत आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस (Polie station) ठाण्यात अशाच एका घटनेची नोंद झाली आहे. दोन वर्षाच्या (Two Year) लहान मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घराच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या हौदात पडूनच दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये यापूर्वी देखील पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांचा कधी झोका खेळतांना फास लागून तर कधी बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मागील आठवड्यातच आठ महिन्यांच्या बाळाने नेलकटर गिळले होते. ही घटना ताजी असतानाच घराच्या बाजूला असलेल्या दोन वर्षीय चिमूरड्याचा हौदात पडून मृत्यू झाला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाकळीरोड परिसरातील ही हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकळीरोड येथील पंचकृष्ण बंगला येथे ही दुर्दवी घटना घडली आहे.
पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आदी हे रमेश चव्हाण यांच्यासोबत राहतात. मुलगा घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या हौदाजवळ गेला.
तो हौदाच्या भिंतीवर चढला आणि त्याचा थेट हौदातच तोल गेला. बराच वेळ होऊन मुलगा आदी दिसत नसल्याने आई सपना चव्हाण यांनी आदीचा शोध सुरू केला.
हौदाच्या जवळ जाऊन पाहिले असता मुलगा पाण्यात पडलेला दिसल्याने त्याला बाहेर काढले. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याला दवाखान्यात नेण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून तो मृत असल्याचे सांगितले. यावेळी आदीच्या पालकांनी रुग्णालयातच मोठ्याने हंबरडा फोडला होता.
घटनेची माहिती मिळताच पाहणी करत भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.