भांडण लहान मुलांचं, बालिशपणा पालकांचा, दोन भावांचा मोठ्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

चंद्रपुरा जिल्ह्यातील गडचांदूर शहरात दोन लहान भावांनी आपल्या 46 वर्षीय मोठ्या भावावर डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांच्या भांडणामागील कारण होतं ते त्यांच्या लहान मुलांमध्ये झालेलं भांडण.

भांडण लहान मुलांचं, बालिशपणा पालकांचा, दोन भावांचा मोठ्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु
भांडण लहान मुलांचं, बालिशपणा पालकांचा, दोन भावांनी मिळून मोठ्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 3:33 PM

चंद्रपूर : मुलं देवाघराची फुलं, असं आपण म्हणतो. लहान मुलं आपल्या भावंड-मित्रांसोबतद खेळतात, खेळताना ते भांडणं करतात, रडतात, त्यानंतर परत एकत्रही येतात. लहान मुलांच्या या भांडणांना आपण कितपत गांभीर्याने घेतलं पाहिजे हे आपण ठरवायला हवं. कारण लहान मुलांना मोठ्या माणसांसारखं समजत नाही. त्यामुळे आपण त्यांना काही गोष्टी सोडून द्यायला शिकवायला हवं. थोडं तुमचं, थोडं आमचं म्हणत एकमेकांवर प्रेम करायला शिकवायला हवं. विशेष म्हणजे आपण त्यांच्या भांडणांचा विषय जिथल्या तिथे सोडून द्यायला हवा. कारण या गोष्टीचा राग मानत धरुन आपण काही विपरीत केलं तर त्याचा परिणाम आणि संस्कार मुलांवरही पडतील. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे चंद्रपुरात घडलेली धक्कादायक घटना.

चंद्रपुरात नेमकं काय घडलं?

चंद्रपुरा जिल्ह्यातील गडचांदूर शहरात दोन लहान भावांनी आपल्या 46 वर्षीय मोठ्या भावावर डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांच्या भांडणामागील कारण होतं ते त्यांच्या लहान मुलांमध्ये झालेलं भांडण. या प्रकरणातील पीडित मोठ्या भावाचं नाव जयदेव मुनेश्वर असं आहेत. ते रविवारी (24 ऑक्टोबर) सकाळी शेतात गेले होते. या दरम्यान त्यांच्या दोन लहान भावांना त्यांच्या मुलांमध्ये झालेला वाद कानी पडला. त्याच मुद्द्यावरुन त्यांनी आपल्या भावावर हल्ला केला.

पीडित जयदेव जेव्हा शेतातून घरी आले तेव्हा आरोपी भावांनी मोठा कालवाकालव केला. घरात मोठा गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही भावांनी मोठ्या भावावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. घरातला गोंधळ ऐकूण आजूबाजूचे काही नागरिक घरात जमले होते. त्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्यक्षदर्शींना देखील भाजल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शींना अडविल्यामुळे जयदेव यांचा प्राण वाचला.

आरोपींना अखेर बेड्या

प्रत्यक्षरदर्शींनी तातडीने जयदेव यांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल केलं. तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन भाऊ आपल्या मोठ्या भावाशी असं वागूच कसं शकतात? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ रवी आणि अमृत यांना बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित घटनेने भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासली आहे. खरंतर या जगात आपल्याला आपले आई-वडील, मित्रमंडळी आणि भावंडांशिवाय कोणीच गरजेच्या वेळी मदत करु शकत नाही. संकट काळात हीच माणसं आपल्या जवळ असतात. ती आपल्याला संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात. याशिवाय एकत्र गुण्यागोविंदाने राहिल्याने समाजात आपल्याकडे नागरिकांचा बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असतो. एकीत बळ असते, असं म्हणतात. त्यामुळे अशा घटनांमधून नुकसानाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेमाने गुण्यागोविंदाने राहिल्याने आपले माणसं जपली जातात आणि त्या नात्यातून आपल्याला समाधान देखील मिळतं.

हेही वाचा :

मॉडेल मोना राय हत्येचे गूढ उकललं, बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण समोर

क्या हुआ तेरा वादा? अनेक वर्ष शारीरिक संबंध, पण लग्नाच्यावेळी पाठ दाखवली, पीडितेची मन हेलावणारी कहाणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.