कारण एक, घटना दोन, जळगावात दोन तरुणांची आत्महत्या
पोटाचा अल्सर या आजाराने त्रस्त असलेल्या दोन तरुणांनी आज (29 ऑगस्ट) आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. दोन्ही घटना या जळगावमध्येच घडल्या आहेत.
जळगाव : पोटाचा अल्सर या आजाराने त्रस्त असलेल्या दोन तरुणांनी आज (29 ऑगस्ट) आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. दोन्ही घटना या जळगावमध्येच घडल्या आहेत. यापैकी पहिला घटना ही सिंधी कॉलनीत घडली. तर दुसरी घटना ही आव्हाणे येथे घडली. सिंधी कॉलनीत 24 वर्षीय तरुण रोहन इंद्रकुमार मेहता याने आत्महत्या केली. तर आव्हाने येथे 40 वर्षीय गंगाधर योगराज पाटील यांनी आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येमागे आजारपण हेच कारण असल्याचं समोर आलं आहे.
पहिली आत्महत्येची घटना
मृतक दोन्ही तरुण अविवाहित आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा रोज सकाळी साडे आठ वाजेनंतरच उठायचा. पण तो आज सकाळी सात वाजताच उठला. त्यावेळी त्याची आई सेवा मंडळात पूजेसाठी गेलेली होती. तर वडील इंद्रकुमार मेहता हे मॉर्निंग वॉकला गेलेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून रोहन याने गळफास घेतला. मंदिरातून आई जेव्हा घरी आली तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबाने एकच हंबरडा फोडून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
दुसरी आत्महत्येची घटना
दुसऱ्या घटनेत गंगाधर हा गेल्या पाच वर्षापासून या आजाराने त्रस्त होता. मृतकाची आई सुमनबाई आणि वडील योगराज भिका पाटील या दोघांचे निधन झालेले आहे. योगराज हा मोठा भाऊ महेश यांच्याकडेच राहत होता. तो अविवाहित होता. रविवारी सकाळी त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोटाचा अल्सर आजाराविषयी थोडक्यात
पोटाच्या अल्सरला पेप्टीक अल्सर असंही म्हणतात. लहान आतड्यांमध्ये फोड विकसित होतात. त्यामुळे पोटदुखी, भूक न लागणे, पोटात जळजळ होणे आणि वजन कमी होणे यासारखे लक्षणे जाणवतात. या आजारामुळे होणारी वेदना ही जेवल्यानंतर किंवा एन्टासिड्स घेतल्याने कमी होते. या आजाराला सुरुवातीला गांभिर्याने घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास या आजारातून लवकर मुक्तता मिळते. पण दुर्लक्ष केल्यास गुंता वाढण्याची शक्यता असते.
कोल्हापुरात महिलेची नदीत उडी घेत आत्महत्या
विशेष म्हणजे कोल्हापुरातही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने कोल्हापुरातील हिरण्यकेशी नदीत उडी घेत आत्महत्या केली. तिने गाठोड्याला सेफ्टी पिनने सुसाईड नोट अडकवून नदीत उडी घेतली होती. गावातील पाच महिला आणि दोन पुरुष अशा सात जणांची नावं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचा प्रकार समोर आल्यानंतर भडगाव पुलावर बघ्यांनी गर्दी केली होती.
सुसाईड नोटमध्ये कोणाची नावं?
पोलिसांनी घटनास्थळी आढळलेलं गाठोडं, चप्पल, ओढणी आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. चिठ्ठीत महिलेने आत्महत्येचे कारण आणि जबाबदार व्यक्तींची नावं लिहिल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांकडून याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा :