Malegaon : मालेगावमध्ये बाईकसह दोन तरुण नदीत बुडाले, अग्निशमन दलाच्या वतीने बचाव कार्य सुरू
किल्ला तैराक ग्रुप व मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांची दुचाकी मिळाली असली. तरी सायंकाळी उशिरापर्यंत शोध त्यांचा शोध घेण्यात आता परंतु त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही
मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहरातील द्याने व श्रीराम नगर (Shreeram Nagar) यांना जोडणाऱ्या पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतला आहे. समोरून पुलावर ट्रक (Truck) आल्याने कठडे नसलेल्या फरशी पुलावरून तोल गेल्याने दोघे तरुण दुचाकीसह पुलावरून नदीपात्रात पडून पुराच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना काल दुपारी दोन वाजता घडली आहे. महाराराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाने पाण्यातून कोणीही प्रवास करु नका असा आदेश दिला आहे. तरी सुध्दा प्रयत्न कऱणाऱ्या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुरात वाहून जाताना अनेकांनी पाहिले
नदीत घसलेली दुचाकी एका पथकाने आणि अग्नीशमक दलाने शोधून काढली आहे. परंतु दोन तरुणांचे मुतदेह अद्याप सापडलेले नाहीत अशी माहिती मिळाली आहे. अब्दुल रहीम पठाण ( 16) शहजात जाकीर शेख ( 19) असे दोघांचे नाव असून दुचाकीसह पुलावरून मोसम नदी पात्रात पडून पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. हे दृश्य बघणाऱ्यांनी आरडाओरोड केली. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने त्यांना वाचविण्याचे धाडस कोणी केले नाही .
जिल्हा प्रशासनाकडून अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत
किल्ला तैराक ग्रुप व मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांची दुचाकी मिळाली असली. तरी सायंकाळी उशिरापर्यंत शोध त्यांचा शोध घेण्यात आता परंतु त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच पाण्यातून कोणीही प्रवास करु नका असं देखील सांगण्यात आलं आहे. आज सकाळी पुन्हा त्यांचं मृतदेह शोधण्याचं काम अग्नीशामक दल हाती घेईल.