Amravati : पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू, कुऱ्हा – धामणगाव रेल्वे रोडवरील घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह हे रस्त्यालगतच्या पाण्याच्या डबक्यात सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी अक्षरशः रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात जाऊन पडली आणि तिथेच या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी शोधाशोध केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे.
अमरावती : (Amravati) अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा ते धामणगाव रेल्वे मार्गावर गुंजी गावानजीक दुचाकीला अज्ञात वाहानाने (Accident) जोराची धडक दिली. या घटनेमध्ये दुचाकीवरील दोन्हीही (The death of young people) तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेत मृत्यू झालेले दोन्ही तरुण हे झारखंड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .गुरुवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर हे तरुण फर्निचरच्या कामासाठी अमरावतीकडे मार्गस्थ होत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
दोघांचेही मृतदेह पाण्याच्या डबक्यात
अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह हे रस्त्यालगतच्या पाण्याच्या डबक्यात सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी अक्षरशः रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात जाऊन पडली आणि तिथेच या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी शोधाशोध केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. मात्र, दोघांचीही जागेवरच मृत्यू झाला होता.
कामासाठी अमरावतीकडे निघाले होते तरुण
मुळचे झारखंड राज्यातील असलेले हे तरुण फर्निचरच्या कामासाठी अमरावतीकडे दुचाकीवर मार्गस्थ होत होते. रात्रीच्या वेळी भरधाव असलेल्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला तर पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
अज्ञात वाहनाने दिली धडक, शोध सुरु
गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे दोन तरुण दुचाकीवरुन अमरावती शहराकडे मार्गस्थ होत होते. दरम्यान, कुऱ्हा ते धामणगाव रेल्वे मार्गावर गुंजी गावानजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. रात्रीच्या वेळी रस्ते निर्मनुष्य असल्याने वाहनाचा शोधही लागला नाही. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेतच यांचा मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.