मित्राला वाचवायला गेलेला मित्रही बुडाला, चार दिवसात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

चार मित्र शुक्रवारी रिधोरा धरण परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान ते धरणामागील घोगरा परिसरात गेले. यावेळी त्यांचा एक मित्र धरणात पोहायला उतरला होता.

मित्राला वाचवायला गेलेला मित्रही बुडाला, चार दिवसात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 2:28 PM

महेश मुंजेवार, TV9 मराठी, वर्धा : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दोन तरुणांचा रिधोरा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात घडली आहे. सौरभ बावरकर आणि विकास नवघरे अशी मयत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या चार दिवसात तीन तरुणांचा या धरणात बुडून मृत्यू झाला आहे.

चौघे मित्र धरण परिसरात फिरायला गेले होते

चार मित्र शुक्रवारी रिधोरा धरण परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान ते धरणामागील घोगरा परिसरात गेले. यावेळी त्यांचा एक मित्र धरणात पोहायला उतरला होता. तो पाण्यात बुडू लागला म्हणून दोन मित्र त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले.

वाचवायला गेले अन् स्वतःच बुडाले

मात्र वाचवायला गेलेल्या दोघांपैकी एक मित्रही बुडू लागला. यावेळी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी वाचवायला गेलेल्यांपैकी एकाला सुखरुप वाचवले. तर अन्य दोघे जण बुडाले.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी सेलू पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी गाठत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दोन दिवसांपूर्वीही याच धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

कोपरगावमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी-भाचीचा मृत्यू

दिवाळीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या नाशिकमधील मावशी-भाचीचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोघी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. मात्र पाय घसरुन नदीत पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. अर्चना जगदीश सोनावणे आणि गौरी शरद शिंदे अशी मयत मावशी-भाचीची नावे आहेत. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.