Udaipur Horror : टेलरचा गळा चिरणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! थरारक घटनेचा व्हिडीओही समोर

Udaipur News : राजसमंद पोलीस दोघांना घेऊन भीम येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. तोपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर आधीच मोठ्या संख्येनं लोकं जमले होते.

Udaipur Horror : टेलरचा गळा चिरणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोळवून तुडवलं! थरारक घटनेचा व्हिडीओही समोर
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 2:04 PM

उदयपूर हादरलंय. टेलरची हत्या (Udaipur Horror) करण्यात आल्यांनं राजस्थानात तणाव आहे. ठिकठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं केली जात आहेत. धारदार शस्त्रानं हिंदू टेलरचा दोघां मुस्लिम युवकांनी गळा चिरला. ही घटना कॅमेऱ्यात (Udaipur murder Video) कैद केली गेली. याचा व्हिडीओही सोशल मीडियात अपलोड करण्यात आलेला होता. त्यानंतर आरोपींनाही पकडण्यात पोलिसांनी यश आलं. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी थरारक पाठलाग करुन नाकाबंदी आणि इतर पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने दोघाही मारेकऱ्यांना पकडलंय. उदयपूरमध्ये (Udaipur News) तालिबानी पद्धतीने गौस मोहम्मद आणि रियाज जब्बार यांनी टेलरचा गळा चिरला होता. त्यानंतर त्यांना उदयपूरपासून 170 किलोमीटर दूर राजसमंद इथं पकडण्यात आलं. या दोघाही मारेकऱ्यांनी केलेल्या संतापजनक कृत्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांना पकडण्याआधीचा थरारक घटनाक्रम समोर आला. कुठे, कधी आणि कसं पोलिसांनी या सगळ्यांना फिल्मीस्टाईने पकडलं, याची माहिती आता समोर आली आहे.

थरारक घटनाक्रम

टेलरची हत्या केल्यानंतर उदयपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातले पोलीसही सतर्क झालेले होते. राजसमंद पोलिसांनी दोघांनाही पकडण्यासाठी भीम-देवगढ परिसरात यंत्रणा उभी केली होती. आधीच नाकाबंदी करण्यात आलेली. दोघाही मारेकऱ्यांचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलेलं होतं. बाईकवरून या दोघांनी टेलरची हत्या करुन पळ काढला होता.

हे सुद्धा वाचा

नॅशनल हायवे 8 वर भीम इथं असलेल्या डाकबंगल्याच्या ठिकाणी पोलिसांना नाकाबंदी केली गेली. पोलिसांना बघात दोघंही आधीच सतर्क झाले. बाईकवर असलेल्या मारेकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. बदनौर येथील चौकातून कॉलेजच्या समोरुन जात हायवेवर आले. तिथून ते पुढे अजमेरच्या दिशेने निघाले होते. यावेळी भीम-देवगढ पोलिसांनी थरारक पाठलाग करत मारेकऱ्यांना बाईकवर संध्याकाळी साडे सहा वाजता गाठलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.

सुपरीटेंडंट पोलिसाच्या धाडसाचं कौतुक

टेलरची हत्या करुन पसार झालेल्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी उदयपूरहून एसपी बाईकवरुन शोधात निगाले होत. बाईकवर ते भीम-देवगढ इथं पोहोचले. उदयपूर आणि आजूबाजूचा परिसरातील पोलिसांनी आधीच फौज तैनात केलेली होती. पोलिसांना अलर्ट करण्यात आलेलं होतं. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. एकूण दहा पथकं या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तैनात करण्यात आलेली.

दरम्यान, गौस मोहम्मद आणि रियाज जब्बा पोलिसांना पाहून पळ काढण्याच्या प्रयत्न होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा थरारक पाठलाग करुन त्यांना रस्त्यावर आडवं पाडलं आणि लाथांनी अक्षरशः तुडवलं. त्यानंतर त्यांचे केसाला पकडून थेट गाडीत बसवलं आणि अज्ञातस्थळी निघून गेले.

म्हणून अज्ञातस्थळी नेलं…

राजसमंद पोलीस दोघांना घेऊन भीम येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. तोपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर आधीच मोठ्या संख्येनं लोकं जमले होते. आरोपींना आमच्या हवाले करा, अशी मागणी संतप्त जमावाकडून केली जात होती. एका वेळी पोलिसांनी जमावाला पांगवलं. पण त्यानंतरही गर्दी पुन्हा वाढतच गेली. अखेर पोलिसांना सुरक्षेखातर आरोपींना घेऊन अज्ञातस्थळ गाठावं लागण्याची वेळ ओढावली.

काय आहे प्रकरण?

नुपूर शर्मा हिच्या समर्थनात पोस्ट केल्यामुळे या टेलरची गळा चिरुन दोघांनी हत्या केली होती. हत्येनंतर या दोघांनी व्हिडीओही पोस्ट केला होता. इतकंच काय तर हत्येआधीच आपण टेलरचा जीव घेणार आहोत, आणि नंतर व्हिडीओही अपलोड करु, असा थेट इशाराच मारेकऱ्यांनी आधी दिलेला होता. या धक्कादायक घटनेचे पडसाद उदयपुरात उमटू लागलेले आहेत. त्यानंतर आता परिस्थिती अधिकच चिखळतेय. इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. जयपूरमधून दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उदयपूरमध्ये सुरक्षेखातर पाठवण्यात आलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.