अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी रिक्षा चालकाला अटक
त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या तसेच घटनास्थळाच्या आसपास आढळलेल्या पाच जणांची चौकशी केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
उज्जैन | 28 सप्टेंबर 2023 : मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरलं. तेथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (minor girl) करण्यात आला होता. अर्धवट कपडे घातलेली, जखमांमधून रक्तस्त्राव होणारी ती मुलगी कित्येक तास शहरात इकडेतिकडे भटकत होती, पण कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. अखेर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तिला रुग्णालयात नेले व उपचार करण्यात आले. या अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरू केला.
याचसंदर्भात एका ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या रिक्षाच्या बॅकसीटवर रक्ताचे डाग आढळून आले असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. त्यानंतर ही कारवाई करण्यात. संशयाच्या आधारे ऑटो चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे गुरूवारी पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त होत आहे.
चौकशीअंती रिक्षाचालकाला अटक
पोलिसांना या घटनेची माहिती 25 सप्टेंबर रोजी मिळाली आणि तातडीने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक एसआयटी स्थापन करण्यात आली आणि सर्व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. पुराव्यांच्या आधारे रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली, असे उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी सांगितले. ही घृणास्पज घटना घडली तेव्हा आपण मुलीसोबतच असल्याचे रिक्षाचालकाने मान्य केल्याचेही ते म्हणाले. याप्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
समुपदेशकही बोलावले
या निर्घृण घटनेमुळे त्या मुलीच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने ती खूपच अस्वस्छ होती. तिला बोलतं करण्यासाठी, समजावण्यासाठी समुपदेशक बोलावण्यात आले. सुरूवातीला ती मुलगी खूपच घाबरली होती. ती कोण, कुठली हेही धड सांगता येईना. अखेर समुपदेशकाने हळूहळू बोलून, तिला विश्वासात घेतलं आणि बोलतं केलं. अखेर ती कुठली आहे, तिचं गाव कोणतं हे स्पष्ट झाल्याचं पोलिस म्हणाले.
याप्रकरणी एकूण पाच जणांची चौकशी
ही घृणास्पद घटना घडण्याच्या एक दिवस अगोदर मुलगी बेपत्ता झाली होती, अशी माहिती मिळाली. तिची अधिक माहिती लवकरच समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा त्या मुलीच्या किंवा घटनास्थळाच्या आसपास जे दे लोक होते, अशा पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांचीही चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस म्हणाले.