मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली. क्राईम ब्रँचने त्यांची अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. राज कुंद्रा यांनी काही अॅप्सद्वारे अश्लील चित्रपट बनवून ते प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलीय. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली, आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असेही गुन्हे शाखेनं सांगितलंय.
काही दिवसांपूर्वी वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रपट बनवण्याचे रॅकेट उघडकीस आले होते, त्यात गहना वशिष्ठ यांचे नाव आले होते. या प्रकरणात तन्वीर हाश्मी नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पोलिसांनी गुजरातच्या सुरत येथून अटक केली होती. ते वेगवेगळ्या व्हिडीओ अॅप्सवर चित्रपट कसे डाऊनलोड करायचे, याची माहिती तन्वीर हाश्मीने चौकशीत दिली होती. या प्रकरणात उमेश कामत यांनाही अटक करण्यात आली होती. त्याचवेळी उमेश कामत हे राज कुंद्राच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक होता. त्यावेळी वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवण्याचे हे रॅकेट मुंबई आणि गुजरातमधून देश-विदेशात पसरत असल्याचे वृत्त समोर आले होते.
Businessman Raj Kundra has been arrested by the Crime Branch in a case relating to creation of pornographic films & publishing them through some apps. He appears to be the key conspirator. We have sufficient evidence regarding this: Mumbai Police Commissioner pic.twitter.com/LbtBfG4jJc
— ANI (@ANI) July 19, 2021
सोमवारीच शिल्पाचे पती राज यांना गुन्हे शाखेने समन्स बजावले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही राज अनेक वेळा वादात सापडले आहेत. यापूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे यांनी राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्राच्या कंपनीने तिच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप पूनम यांनी केला होता. राज कुंद्रा यांनी या प्रकरणी आपल्यावरील आरोप खोडून काढले होते. असे म्हटले होते की, त्यास आपले काही देणे-घेणे नाही. ज्या कंपनीने अश्लील व्हिडीओ बनविल्याचा आरोप आहे, त्या कंपनीशी आपला संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
UK server to OTT platform, Raj Kundra arrested, what exactly is the case?