VIDEO : उल्हासनगरात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड, घटनेने परिसरात खळबळ

उल्हासनगरमध्ये अज्ञात टोळीने धोबी घाट भागात उभ्या असलेल्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून घटना घडताच उल्हासनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोडफोड झालेल्या गाड्यांची पाहणी पोलिसांनी केली आणि स्थानिक नागरिकांची चौकशीही केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

VIDEO : उल्हासनगरात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड, घटनेने परिसरात खळबळ
उल्हासनगरात गाड्यांची तोडफोड
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 12:22 PM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये अज्ञात टोळीने धोबी घाट भागात उभ्या असलेल्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून घटना घडताच उल्हासनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोडफोड झालेल्या गाड्यांची पाहणी पोलिसांनी केली आणि स्थानिक नागरिकांची चौकशीही केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर कॅम्प-1 येथील धोबी घाट भागात रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या 10 ते 15 रिक्षा आणि मोटारसायकल गाड्यांची फोडतोड केल्याची घटना घडलीये. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

यापूर्वी या परिसरात दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सदरचा प्रकार कोणत्या टोळीने केला याबाबत स्थानिक नागरिक संभ्रमात पडले आहेत. घटना घडल्यानंतर नागरिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.

उच्चभ्रू वस्तीत 16-17 गाड्यांची तोडफोड

औरंगाबाद शहरातील वेदांत नगर परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सोळा ते सतरा गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची रात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाहन चालकांनी आपल्या गाड्यांमधून दोन ते तीन लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे.

वेदांत नगर परिसर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती मानली जाते. मात्र ही तोडफोड नक्की कोणी केली आणि का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

घरासमोर जाऊन चौघांनी वाद घातला, 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार

टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा; नाशिकमध्ये 5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या

सहा वर्षांच्या चिमुकलीचा अत्याचार करुन खून, मृतदेह झुडपात फेकला, कोल्हापुरातील संतापजनक घटना

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.