Ulhasnagar Crime : रस्त्याने जाताना साईड नाही दिली, संतापलेल्या बाईकस्वाराचे भयानक कृत्य

रिक्षाचालकाने साईड न दिल्याने बाईकस्वाराने त्याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. मात्र हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर त्या तरूणाने रिक्षाचालकाला बाहेर काढून मारहाण केली.

Ulhasnagar Crime : रस्त्याने जाताना साईड नाही दिली, संतापलेल्या बाईकस्वाराचे भयानक कृत्य
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 11:42 AM

मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उल्हासनगर | 25 ऑक्टोबर 2023 : उल्हासनगर शहर गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमुळे (Ulhasnagar Crime) गाजतयं. दुकानासमोर पार्क केलेला ट्रक काढायला सांगितला म्हणून ट्रकचालकाने दुकानदाराला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली. तर मुलाला शाळेतून सोडून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन चोरट्यांनी पळवल्याची (chain snatching) घटनाही ताजीच आहे. गुन्ह्यांच्या या घटनामुळे शहरातील नागरिक अतिशय धास्तावले आहेत.

असे असतानाच आता शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एका छोट्याशा कारणावरून बाईकस्वाराने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. यामध्ये पीडित रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र यामुळे रिक्षा चालक हे नाराज झाले आहेत. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईड न दिल्याच्या रागातून हल्ला

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प १ च्या परिसरात हा प्रकार घडला. पीडित रिक्षाचालक दीपक राजपूत हे कॅम्प १ च्या बेफेक्रि चौक रस्त्यावरून जात होते. तेव्हा राजपूत यांच्या रिक्षाच्या मागे असलेल्या बाईकवर, सत्यम तिवारी आणि अनिषा धामेजा ही मुलगी हे दोघे बसले होते. त्यांना बाईक पुढे न्यायची होती, मात्र राजपूत यांनी बाईक पुढे जाऊ देण्यासाठी साईड न दिल्याने बाईकस्वार सत्यम आणि अनिषा यांनी राजपूत यांना थांबवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली.

बघता बघता हा शाब्दिक वाद बराच पेटला आणि त्यांनी राजपूत यांना शिवीगाळ करत भररस्त्यात थेट लाथा-बुक्क्याने तुडवून बेदम मारहाण केली. यामध्ये रिक्षा चालक दीपक राजपूत गंभीर जखमी झाले, त्यांचा जबडाच फ्रॅक्चर झाला. त्यांना उपचारांसाठी तातडीने शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीची ही संपूर्ण घटना तेथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाली. आता याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बाईकस्वार अनिषा आणि सत्यम तिवारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकांनी या घटनेचा तीव्र विरोध दर्शविला आहे.

पार्क केलेला ट्रक काढायला सांगितल्यामुळे मारहाण 

गुन्ह्याची आणखी एक घटना उल्हासनगर शहरात काही दिवसांपूर्वीच घडली. दुकानासमोर पार्क केलेल्या टेम्पोवरून वाद सुरू झाल्यानंतर भडकलेल्या टेम्पो चालकाने दुकानदारावर (attack on shopkeeper) जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तो दुकानदार गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उल्हासनगर शहरातील कॅम्प १ येथे बिर्ला गेटसमोर हरीश मदन गोपाल सोनी यांचे ‘श्री अंबिका ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हरीश मदन गोपाल सोनी हे त्यांच्या दुकानात बसले असताना त्यांच्या दुकानासमोर एका टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो थांबवला. मात्र मदन यांना त्यांची गाडी दुकानासमोर उभी करायची होती. त्यामुळे त्यांनी टेम्पो चालकाला त्याचा ट्रक दुकानासमोरून हटवण्यास सांगितले, पण त्याने काही ऐकले नाही. मदन यांनी तीन चार वेळा त्याला ट्रक दुकानासमोरून हटवण्यास सांगितले. यामुळे तो ट्रकचालक संतापला आणि त्याने ट्रक तिथून न काढता थेट दुकानदार मदन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्याने त्यांना लाथाही मारल्या.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.